Dharma Sangrah

प्रसिद्ध हॉलीवूड अभिनेता विल स्मिथ हिंदी चित्रपट सृष्टीत एन्ट्री करणार

सोमवार, 15 एप्रिल 2019 (09:23 IST)
निर्माता, दिग्दर्शक करण जोहरचा येणारा नवीन चित्रपट स्टुडंट ऑफ द इअर 2 लवकरच प्रदर्शित होणार आहे. तर
या चित्रपटाचे खास आकर्षण असणार आहे तो म्हणजे हॉलिवूडचा सुपरस्टार अभिनेता विल स्मिथ होय. या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये विल एन्ट्री करणार आहे. त्याच्या सोशल मिडीया पेज वरून एका व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये विल स्मिथ स्टुडंट ऑफ द इअर चित्रपटातील कलाकारांसोबत नाचतांना दिसून येतो आहे. यामुळे विल स्मिथही यामध्ये काम करणार असल्याची चर्चा सध्या सुरु आहे. या चित्रपटाच्या ट्रेलर लाँचिंग दरम्यान करण जोहर यांना विल स्मिथबद्दल विचारण्यात आले यावर करण जोहर म्हणाला की विल स्मिथ फेसबुकवरील एक शो ‘बकेट लिस्ट’च्या शूटिंगसाठी भारतात आला आहे. मात्र स्मिथला बॉलिवूडच्या एका गाण्यावर डान्स करण्याची फार इच्छा होती, चित्रपटात विल स्मिथ काम करणार आहे किंवा नाही यांवर मी काही सांगणार नाही. तुम्हाला हे माहित करुन घेण्यासाठी चित्रपट पहावा लागेल असे करण म्हणाला आहे. करण जोहर नेहमीच प्रेक्षकांना धक्का देतो त्यामुळे विल लवकरच चित्रपटात दिसेल असे चित्र आहे.

सर्व पहा

धर्मेंद्र यांच्या बायोपिकमध्ये मुख्य अभिनेता कोण साकारणार?बॉबी देओलने हे उत्तर दिले

खिशाला कात्री न लावता सरकारी बजेट पॅकेजेसमध्ये फॅमिलीसोबत सुरक्षितपणे फिरून या

चित्रपट महामंडळाला स्थिर आणि कृतिशील कार्यकारिणी देण्याची समर्थ पॅनलची ग्वाही

रणवीर सिंगने एफडब्ल्यूआयसीई (FWICE) बंदीविरोधात न्यायालयात धाव घेतली, कायदेशीर नोटीस पाठवली

'दुसरा राम कोणालाही बघायचा नाही', रामायणममधील रणबीर कपूरच्या कास्टिंगच्या वादावर अरुण गोविल यांचे मोठे विधान

सर्व पहा

'तुमच्या मुलीने तसले कपडे घातले तर!' अंगप्रदर्शनाबाबतच्या दिग्दर्शकाच्या मागणीवर भडकल्या ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ निवडणूक : मेघराज राजेभोसले यांचा विजय; वर्षा उसगावकर बिनविरोध निवडून आल्या

जावेद जाफरी यांच्या पत्नीची 16.24 कोटींची फसवणूक; बीएमसी अधिकाऱ्याचे निलंबन

वाराणसीचा रहस्यमय शिवधाम, जिथे भगवान रामांना रावणाच्या हत्येच्या पापापासून मुक्ती मिळाली

शेखर सुमनच्या गर्विष्ठ राजा आणि त्याच्या दरबारातील खुशामतखोराच्या व्हिडिओमुळे एवढा गदारोळ का झाला

पुढील लेख
Show comments