आधुनिक भारतात अर्थसंकल्पाची सुरुवात करण्याचे श्रेय ब्रिटिश-भारताचे पहिले व्हाईसरॉय लार्ड कॅनिंग यांना जाते. 1856-62 पर्यंत ते भारतात होते. 1857च्या उठावानंतर 1859 मध्ये पहिल्यांदा एक अर्थतज्ज्ञ जेम्स विल्सन यांना व्हाईसरॉयच्या कार्यकारिणीचे अर्थसदस्य म्हणून नियुक्त करण्यात आले. यानंतर जेम्स विल्सन यांनी 18 फेब्रुवारी 1860 ला व्हाईसरॉय परिषदेत पहिल्यांदा अर्थसंकल्प सादर केला. ब्रिटिश अर्थमंत्र्यांच्या...