बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. बजेट 2019-20
Written By

हे सहा आहेत केंद्रीय अर्थसंकल्पा मागे त्यांनी तयार केले आहे बजेट २०१९

पाच जुलैला अर्थमंत्री निर्मला सीतारमण आपल्या नवीन सरकारचा पहिला अर्थसंकल्प सादर करतील. हे बजेट या वर्षीच्या जुलै पासून मार्च २०२० पर्यंतच्या कालावधीसाठी सादर केले जाणार आहे. हे बजेट बनविण्यामध्ये वित्त राज्यमंत्री अनुराग ठाकुर यांच्यासहित ६ लोकांची भूमिका प्रमुख आहे. जाणून घेऊयात या अधिकाऱ्यांबद्दल 
 
१. मुख्य आर्थिक सल्लागार कृष्णमूर्ति सुब्रमण्यम :कृष्णमूर्ति सुब्रमण्यम यांचे शिक्षण इंडियन स्कूल ऑफ बिजनेस मध्ये सहाय्य्क प्राध्यापक असून एक प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ आहेत. त्यांनी शिकागोमधील विद्यापीठातून पीएचडी मिळवलेली असून ते आयआयटी चे देखील विद्यार्थी आहेत. ८ नोव्हेंबर २०१६ रोजी झालेल्या नोटबंदीच्या निर्णयाचे त्यांनी समर्थन केले होते.
 
२. महसूल सचिव अजय भूषण पांडेय : १९८४ च्या बॅच चे आयएएस असणारे अजय भूषण पांडेय सध्या अर्थमंत्रालयामध्ये महसूल सचिव आहेत. याआधी ते आधार ची कार्यप्रणाली असणाऱ्या युनिक आईडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (यूआईडीएआई) चे सचिव होते. भूषण यांची जीएसटी वर चांगली पकड आहे.
 
३. वित्त सचिव सुभाष चंद्र गर्ग : १९८३ च्या बॅच चे आयएएस असणारे सुभाष चंद्र गर्ग हे मंत्रालयातील परकीय गुंतवणूक बाजार, भांडवली बाजार, अर्थसंकल्प आणि इंफ्रास्ट्रक्चर फायनान्स इत्यादी गोष्टींवर बारकाईने लक्ष ठेऊन आहेत. याआधी त्यांनी जागतिक बँकेत कार्यकारी निर्देशक म्हणून काम केले आहे. विविध संस्थांना दिल्या जाणाऱ्या फंडिंग संदर्भात निर्णय घेण्याचा अधिकार देखील त्यांना आहे.
 
४. निर्गुंतवणूक सचिव अतानु चक्रवर्ती :अर्थमंत्रालयातील निर्गुंतवणूक सचिव असणारे अतानु चक्रवर्ती गुजरात केडर चे १९८५ बॅच चे अधिकारी आहेत. याआधी ते पेट्रोलियम मंत्रालया च्या हाईड्रोकार्बन विभागावाचे डायरेक्टर म्हणजेच (महानिर्देशक) होते. त्यांनी बिजनेस फायनान्स मध्ये पदव्युत्तर पदवी मिळवलेली आहे.\
 
५. खर्चविषयक सचिव गिरीश चंद्र मुर्मू :गुजरात केंद्रचे वरिष्ठ अधिकारी असणारे गिरीश चंद्र मुर्मू प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे निकटवर्तीय मानले जातात. ते पीएमओ आणि गृह मंत्रालयामध्ये सचिव देखील होते. सध्या ते वित्त मंत्रालयात खर्चविषयक सचिव म्हणून काम पाहतात.
 
६. वित्तीय सेवा सचिव राजीव कुमार :राजीव कुमार हे सध्या वित्त मंत्रालयात वित्तीय सेवा सचिव असून याआधी त्यांनी बिहार, झारखंड सरकार तसेच केंद्र सरकार च्या अनेक प्रमुख मंत्रालय आणि विभागांमध्ये काम केलेले आहे. त्यांना ३३ वर्षांच्या कामकाजाचा अनुभव असून त्यांनी खर्च विभागात संयुक्त सचिव म्हणून देखील काम केले आहे.