बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. करिअर
  3. करिअर मार्गदर्शन
Written By
Last Modified: शुक्रवार, 22 जानेवारी 2021 (09:49 IST)

Aayush Neet UG काउंसलिंग साठी रजिस्ट्रेशन सुरु, या प्रकारे करा आवेदन

Ayush NEET UG काउंसलिंग 2020 साठी रजिस्ट्रेशन प्रक्रिया सुरु झाली आहे. आयुष एडमिशन सेंट्रल काउंसलिंग कमेटी (AACC) ने तिसर्‍या फेरीसाठी रजिस्ट्रेशन प्रक्रिया सुरु केली आहे. यात भाग घेण्यासाठी आयुष च्या अधिकृत वेबसाइटवर लॉग इन केले जाऊ शकतं. काउंसलिंगमध्ये भाग घेण्यासाठी स्पर्धकांना 24 जानेवारी दुपारी 12 वाजेपर्यंत अधिकृत वेबसाइट aaccc.gov.in वर लॉग इन करत रजिस्ट्रेशन करवावे लागेल.
 
आधिकृत शेड्यूल प्रमाणे आपल्या आवडीचे पर्याय लॉक करण्यासाठी अंतिम तारीख 24 जानेवारी आहे आणि याचे परिणाम 27 जानेवारी रोजी घोषित केले जातील. ज्या स्पधर्कांची निवड होईल त्यांना मॉप-अप राउंडमध्ये आयुषच्या काउंसलिंगत भाग घ्यावा लागेल. यासाठी स्पर्धकांना आधीपासून अलॉट झालेल्यास संस्थेत 28 जानेवारी ते 8 फेब्रुवारी दरम्यान पोहचावे लागेल. काउंसलिंगमध्ये भाग घेणार्‍या विद्यार्थ्यांना वेबसाइटवर देण्यात आलेल्या शेड्यूलचं विशेष लक्ष द्यावे लागेल.
 
या प्रकारे करा काउंसलिंगसाठी रजिस्ट्रेशन
आयुषच्या अधिकृत वेबसाइट aaccc.gov.in वर लॉग इन करा
होमपेजवर यूजी काउंसलिंगवर क्लिक करा
न्यू रजिस्ट्रेशनवर क्लिक करा आणि येथे आवश्यक माहिती भरा
एप्लिकेशन फॉर्म भरुन सबमिट करा.