शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. थोडं आंबट थोडं तिखट
Written By

कैरीची आंबट गोड चटणी

साहित्य - 1/2 वाटी कमी आंबट कैरीचा कीस, किसाएवढा सुक्या खोबर्‍याचा कीस, 3 चमचे गूळ, 2 चमचे जिरे, 2 चमचे लाल तिखट, मीठ, कोथिंबीर आणि आवडत असल्यास फोडणी. 
 
कृती - मिक्सरच्या भांडय़ात मीठ, तिखट आणि जिरे बारीक करून घ्यावे. त्यात कैरीचा आणि खोब:याचा कीस घालून ओबडधोबड चटणी वाटावी. त्यात कोथिंबीर घालून एकदा मिक्सर फिरवावं. दोन चमचे तेलाची मोहरी, जिरे आणि हिंग घालून फोडणी करावी. फोडणी थोडी थंड झाल्यावर चटणीवर घालून अलगद मिक्स करावी. गाकर आणि चटणी डब्यात भरावी.