गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: सोमवार, 15 मार्च 2021 (11:48 IST)

मराठवाड्यात कोरोनाचे 2,467 नवीन रुग्णांची नोंद, 11 जणांचा मृत्यू

औरंगाबाद- महाराष्ट्राच्या मराठवाड्यात भागात कोरोना व्हायरस (कोव्हिड-19) चा उद्रेक वाढत असून मागील 24 तासात संक्रमित 2,467 नवीन रुग्णांची नोंद झाली असून 11 जणांचा मृत्यू झाला आहे.
 
आरोग्य अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार सर्व जिल्हा मुख्यालयातून एकत्र माहितीप्रमाणे याभागातील आठ जिल्ह्यांपैकी औरंगाबाद सर्वात अधिक प्रभावित आहे जेथे संक्रमणाचे 1023 नवीन प्रकरण समोर आले आणि पाच लोकांचा मृत्यू झाल्याचे समजले. यानंतर नांदेडमध्ये 566 नवीन केसेस समोर आले आणि दोन लोकांचा मृत्यू झाला. जालनामध्ये 308 नवीन केसेस समोर आले असून एकाचा मृत्यू झाला आहे. बीडमध्ये 260 नवीन प्रकरण समोर आले असून एकाचा मृत्यू झाला. लातूरमध्ये 110 नवीन प्रकरण समोर आले आणि एकाचा मृत्यू झाल्याची बातमी आहे. उस्मानाबाद येथे 69 आणि हिंगोलीमध्ये 44 नवीन प्रकरणं समोर आली आहेत.