Daily Horoscope
✕

नक्की वाचा कोरोनालाही हरवता येतं… नागपुरातील कोरोना बाधिताचा स्वानुभव!

Updated: बुधवार, 1 एप्रिल 2020 (16:15 IST)
 
कोरोना ट्रिटमेंटच्या प्रोटोकॉलनुसार सुरूवातीला मला आयोसलेशन वार्डमध्ये ठेवण्यात आले. खरं म्हणज सुरूवातीला थोडं टेन्शन आलं होतं. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध आहेत. त्यामुळे मला बरे वाटले.
 
मात्र मला आयसोलेशन करण्यात आलेल्या वार्डमध्ये मी स्वत:साठी टाईमटेबल बनविला. त्यात मी वाचन, रुममध्येच वॉक, यु-टयूबवरील सकारात्मक व्हिडिओचा समावेश होता. या काळात मी कटाक्षाने कोरोनासंबंधित नकारात्मक बातम्या किंवा अन्य साहित्य वाचले नाही. कोरोनाचा मृत्यूदर कमी असल्याचे मी वाचले. त्यामुळे मला हॉस्पिटलमार्फत देण्यात येणाऱ्या प्रतिबंधात्मक सूचनांचं मी काटेकोरपणे पालन केले. माझ्या आजारादरम्यान मला जिल्हा प्रशासनातर्फे पूर्ण सहकार्य करण्यात आले.
 
आयसोलेशनदरम्यान माझ्यापर्यत कोणी येत नव्हतं. साधारण 7 व्या दिवशी माझ्या घशातील स्त्रावाच्या नमुन्याची तपासणी करण्यात आली. तो निगेटिव्ह आला. 
 
डिस्चार्जनंतरही मला घरी मास्क घालून व घरातील सदस्यापासून दूर राहण्याचे डॉक्टरांनी सांगितले. तसेच या दरम्यान खोकला किंवा सर्दी वाटल्यास तात्काळ  दवाखान्यात येण्याच्याही सूचना दिल्यात.
 
माझ्या मते कोरोनाला योग्य ती काळजी घेऊन पूर्ण हरविता येते. मी एकांतवासाचा सुयोग्य वापर केला होता. रूममध्येच व्यायाम केला. तसेच सकारात्मक विचारांनी आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते. त्यासाठी चौरस आहारही घेणे आवश्यक आहे. कोरोना विषाणूच्या संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी घरीच थांबा व सुरक्षित राहा.

सर्व पहा

फुफ्फुसे मजबूत करण्यासाठी दररोज फक्त १० मिनिटे प्राणायाम करा, फायदे जाणून घ्या

कमी वेळात काढा सोपी अन् सुंदर रांगोळी! ५ मिनिटांत बनणाऱ्या ४ बेहतरीन डिझाइन्स

टिकू तलसानिया आणि पूजा जोशी यांच्या 'देवी विज्ञानम' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

धूर्तपणाचे वाईट परिणाम होतात; पिंजऱ्यातील सिंह...हितोपदेशातील गोष्ट

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घराच्या मुख्य दारावर 'या' ५ गोष्टी नक्की लावा

सर्व पहा

२५ रुपयांत ११३ किमी धावणारी स्कूटर! १० लाख कुटुंबांपर्यंत पोहोचली

LIVE: महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, भरती परीक्षांसाठी वयोमर्यादा वाढवली

पतियाळामध्ये कर्मभूमी एक्सप्रेसच्या चार डब्यांना आग सर्व प्रवासी सुरक्षित

जसप्रीत बुमराह आणि हे ३ भारतीय क्रिकेटपटू उद्या लाल चेंडूच्या क्रिकेटमध्ये पुनरागमन करतील

भारतीय पुरुष हॉकी संघाने जपानला पराभूत करून सहाव्यांदा विजेतेपद पटकावले

पुढील लेख
Show comments