बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: मिन्स्क , बुधवार, 1 एप्रिल 2020 (15:26 IST)

वोडका प्या, हॉकी खेळा आणि कोरोना पळवा...!

कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी बेलारूसचे राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर लुकाशेनको यांनी देशवासिांना एक अजब सल्ला दिला आहे. वोडका प्या, हॉकी खेळा आणि बानया (पारंपरिक स्टीम बाथ) घेण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. कोरोनाने जगभरात थैमान घातले असून या रोगाने अनेकांचे बळी घेतले आहेत.

युरोपमध्ये सध्या बेलारूस फुटबॉल प्रीमिअर लीग सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे आवाहन केले आहे. दोन दिवसापूर्वी त्यांनी एक हॉकी सामना पाहण्याची स्टेडियममध्ये हजेरी लावली होती.