शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: शुक्रवार, 8 ऑक्टोबर 2021 (09:32 IST)

corona News :महाराष्ट्र सरकार 'मिशन कवच कुंडल' सुरू करेल-आरोग्यमंत्री राजेश टोपे

कोविड -19 लसीकरणाला गती देण्यासाठी ही मोहीम राबवली जाईल .या अंतर्गत दररोज 15 लाख लोकांना लसीकरण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.
 
राज्य सरकार 8 ते 14 ऑक्टोबर दरम्यान कोविड -19 विरुद्ध विशेष लसीकरण मोहीम राबवेल. या दरम्यान, दररोज 15 लाख लोकांना लसीकरण करण्याचे लक्ष्य असेल. महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी गुरुवारी ही माहिती दिली.
 
टोपे यांनी पत्रकारांना सांगितले की 15 ऑक्टोबरपर्यंत 100 कोटी लोकांच्या कोविड -19 लसीकरणाचे लक्ष्य साध्य करण्याच्या दृष्टीने 'मिशन कवच कुंडल' राबविले जाईल. ते म्हणाले की, केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी बुधवारी त्यांच्याशी या विषयावर चर्चा केली होती.
 
8 ते 14 ऑक्टोबर दरम्यान आम्ही 'मिशन कवच कुंडल' चालवू, असे राज्याचे आरोग्य मंत्री म्हणाले. या अंतर्गत आम्ही दररोज 15 लाख लोकांना लसीकरणाचे लक्ष्य ठेवले आहे. को-विन अॅपनुसार, गुरुवारी दुपारपर्यंत देशातील 92.85 कोटीहून अधिक लोकांना ही लस दिली गेली आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत 8.54 कोटी लोकांचे लसीकरण करण्यात आले आहे.