गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: मंगळवार, 5 ऑक्टोबर 2021 (08:49 IST)

राज्यात पाच हजारांहून अधिक जणांना डिस्चार्ज, 2,026 नवे रुग्ण

महाराष्ट्रात नव्या कोरोना रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या अधिक आहे. सोमवारी  2 हजार 026 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली असून, 5 हजार 389 बरे झालेल्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्याचा रिकव्हरी रेट 97.31 टक्के एवढा झाला आहे.

राज्यातील एकूण कोरोना बाधित रूग्णांपैकी 63 लाख 86 हजार 059 कोरोना रूग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सध्या राज्यात 33 हजार 637 ॲक्टिव्ह कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. राज्यात आतापर्यंत 8 कोटी 36 लाख 52 हजार 595 जणांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली आहे.

महाराष्ट्रात  शाळा पुन्हा सुरू झाल्या आहेत. तब्बल दीड वर्षाहून अधिक काळ कोरोनामुळे शाळा महाविद्यालये बंद ठेवण्यात आली होती. राज्यातील कमी होत चाललेला कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता राज्य सरकारने आजपासून शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. पण, संभाव्य तिसऱ्या लाटेची भीती अजूनही काही पालकांच्या मनात असल्याने पहिल्या दिवशी शाळेत विद्यार्थ्यांची अल्प उपस्थिती होती.