Marathi Biodata Maker

कोरोनाबाधिताकडून रुग्णवाहिका चालकाला मारहाण, अंगावरही थुंकला

Updated: शुक्रवार, 17 एप्रिल 2020 (07:47 IST)
 
या घटनेत शहरातील मनमाड चौफुली भागात असलेले जीवन हॉस्पिटल व मन्सूरा युनानी कॉलेजचे रुग्णालय या दोन ठिकाणी करोनाबाधित रुग्णांवर उपचारासाठी विलगीकरण कक्ष सुरू करण्यात आले आहेत. त्यामुळे सामान्य रुग्णालयात दाखल असणाऱ्या करोनाबाधित रुग्णांना सोयीनुसार या दोन्ही रुग्णालयांमध्ये हलविण्यात येत आहे. यानुसार एका करोनाबाधित रुग्णाला महापालिकेच्या रुग्णवाहिकेतून जीवन हॉस्पिटलला नेण्यात आले. मात्र यावर आक्षेप घेऊन जीवन ऐवजी आपल्याला मन्सूरा रुग्णालयात दाखल करावे असा आग्रह या रुग्णाने चालकाकडे धरला. रुग्णालयाच्या प्रशासनाने दिलेल्या आदेशाच्या बाहेर जाता येणार नाही असे सांगत चालकाने त्यास नकार दिला. त्यामुळे संतापलेल्या रुग्णाने चालकावर दमबाजी करायला सुरुवात केली. पुढे थेट मारहाण करत चालकाच्या अंगावरही थुंकला.
 
विशेष म्हणजे महापालिका उपायुक्त कापडणीस यांनी सदरच्या प्रकाराविषयी दुजोरा दिल्याची क्लीप सोशल मीडियावर आता व्हायरल झाली आहे. अशा घटना रोखण्यासाठी जीवन हॉस्पिटलसह अन्य रुग्णालयांमध्ये पोलीस बंदोबस्त देण्यात यावा अशी मागणी आता रुग्णालय कर्मचाऱ्यांकडून करण्यात आली आहे.   
 

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

सर्व पहा

आशिया कप क्रिकेट सामन्यात भारत आणि पाकिस्तान पुन्हा एकदा आमनेसामने येतील

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली; अनेक मुद्द्यांवर चर्चा

2026 Mahindra Scorpio-N भारतात दाखल! ५४०° कॅमेरा अन् मोठ्या स्क्रीनसह मिळतील धडाकेबाज फीचर्स; जाणून घ्या किंमत

LIVE: महाराष्ट्र सरकारने दहशतवादी साहित्याविरोधात मोठी कारवाई करत सामग्री जप्त केली

महाराष्ट्र सरकार ने दहशतवादी साहित्याविरोधात मोठी कारवाई केली, पुस्तके आणि डिजिटल सामग्री जप्त

पुढील लेख
Show comments