Festival Posters

कोरोनाव्हायरस जरी रिपोर्ट नकारात्मक आला ,तरी कोरोना असू शकतो

Updated: मंगळवार, 16 मार्च 2021 (21:44 IST)
खरं तर ,बऱ्याच वेळा कोरोना चाचणीमध्ये आढळून येत नाही. त्याचे मुख्य कारण म्हणजे की आता या विषाणूच्या नवीन स्ट्रेन किंवा म्युटेशन ने आपले लक्षण बदलून दिले आहेत. म्हणून बऱ्याच वेळा हे चाचणीच्या वेळी आढळून येत नाही. म्हणून निश्चिन्त होऊन असे समजू नका की आपल्याला कोरोनाची लागण लागलेली नाही .

डॉ. समीर माहेश्वरी  'एमबीबीएस ' स्पष्ट करतात की या विषाणूचे नवीन म्युटेशन पूर्वी  पेक्षा अधिक संसर्गजन्य आहे आणि या  नवीन विषाणूंची लक्षणे देखील बदलून येत आहे. 
त्यांनी सांगितले की या पूर्वी सर्दी,खोकला, ताप, गंध कमी होणे,आणि चव नसणे सारखे लक्षणे असायचे, परंतु आता असे नाही त्यांनी सांगितले की आता सर्दी, खोकला,आणि तापासह अशक्तपणा आणि जुलाब होणे या सारखे लक्षणे देखील समाविष्ट आहे. अशा परिस्थितीत जर पारंपरिक पद्धतीने तपासणी केल्यावर समजत नाही की कोरोना आहे किंवा नाही. आणि तपासणीचा अहवाल नकारात्मक येतो.    

डॉ. सांगतात की अशा परीस्थितीत सर्दी खोकला सारखे लक्षणे असतील तर डॉक्टरांना दाखवावे  कोरोनाची तपासणी करवावी. या नंतर देखील तपासणीचा अहवाल नकारात्मक आला तर सीटी स्कॅन करा. 
डॉ. सांगतात की सिटी स्कॅन केल्याने हे स्पष्ट होईल की कोरोना आहे की नाही .परंतु सिर्टी स्कॅन डॉक्टरच्या सल्ल्यानुसारच करवावे. 

डॉ.सांगतात की वारंवार सिटीस्कॅन करू नका. या मधून निघणारे रेडिएशन एक्स्पोजर घातक असतात. एकदा केल्या जाणाऱ्या सिटी स्कँन मधून जे रेडिएशन बाहेर पडतात ते 100 एक्स रे च्या प्रमाणे आहे. त्याचे रेडिएशन देखील धोकादायक असतात. या मुळे कर्क रोग होण्याचा धोका असू शकतो.

सर्व पहा

Ganesh Chaturthi 2026 Sthapana Shubh Muhurat: १४ सप्टेंबर रोजी गणपती स्थापना शुभ मुहूर्त

देवांना अत्यंत प्रिय असणाऱ्या या फुलांच्या माळा अर्पण करा; मिळवा विशेष आशीर्वाद!

गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी ३ प्रकारच्या चॉकलेट मोदकांची रेसिपी

कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी रोजच्या आहारात हे पदार्थ खा; हाडे आणि दात राहतील मजबूत!

खाऊन योग करणे योग्य आहे की अयोग्य, जेवणानंतर योगा करण्याचे परिणाम जाणून घ्या

सर्व पहा

LIVE: विदर्भातील जिल्ह्यांना २४ तासांकरिता यलो अलर्ट जारी

१८ दिवसांचे उपोषण, ४०० किलोमीटरच्या प्रवासानंतर जारांगेंची प्रकृती खालावली

अभिजीत दीपके यांनी गडचिरोलीतून 'आदिवासी शाळा सुधारा' अभियान सुरू करण्याची घोषणा केली

धक्कादायक! सासरी येण्यास नकार दिल्याने संतापलेल्या पतीने चावून तोडले पत्नीचे नाक

आता दिल्ली ते मुंबई १२ तासांत… भारतीय रेल्वेचे मिशन रफ्तार काय आहे? ताशी १६० किमी वेगाने गाड्या चालवण्याची तयारी

पुढील लेख
Show comments