बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: मंगळवार, 16 मार्च 2021 (19:29 IST)

होळी खेळताना डोळ्याची अशी काळजी घ्या

होळीचा सण जवळचा येत आहे . सध्या होळीमध्ये कृत्रिम रसायनाचे रंग वापरले जातात. त्यामुळे डोळ्यांना आणि त्वचेला त्रास होतो.आपण जरी कोरड्या रंगाने होळी खेळात आहात तरी काळजी घ्या. जेणे करून डोळ्यात किंवा तोंडात रंग जाऊ नये. डोळ्यांची काळजी न घेतल्याने ऍलर्जी, लालसरपणा किंवा अंधत्व देखील येऊ शकतो. या काही टिप्स अवलंबवून आपण डोळ्याची काळजी घेऊ शकता. चला तर मग जाणून घेऊ या. 
 
* फुग्यांना नाही म्हणा- पाण्याने किंवा रंगाने भरलेले फुगे सर्वात अधिक  धोकादायक असतात. हे डोळ्यात लागल्यामुळे मुळे डोळ्यात रक्तस्त्राव देखील होऊ शकतो. या मुळे फुग्यांपासून डोळ्याचा बचाव करा. 
 
*  नैसर्गिक रंगांचा वापर करा- हानिकारक रासायनिक रंगाऐवजी हरभराडाळीचे पीठ,पलाश पाने,बीटरूट, मेहंदी पावडर, गुलमोहर, जास्वंद या नैसर्गिक वस्तूंचा वापर करून रंग बनवा आणि मग होळी खेळा किंवा आपण हर्बल रंग देखील वापरू शकता.   
 
* कोल्डक्रीम किंवा तेल लावा- आपण रंग खेळण्यापूर्वी आपल्या डोळ्याभोवती कोल्डक्रीम किंवा तेल लावावे.डोळ्याभोवतीचा रंग काढताना कोमट पाण्याचा वापर करा आणि डोळे घट्ट बंद करा. कोल्डक्रीम लावल्याने रंग आपोआप निघेल. 
 
* सन ग्लासेस घाला- डोळे पूर्णपणे झाकून ठेवा. सनग्लासेस वापरा. कोणी रंग लावत असेल तर डोळे मिटून घ्या, जेणे करून रंग डोळ्यात जाणार नाही.