मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: मंगळवार, 16 मार्च 2021 (07:53 IST)

सावधान ! देशातील सर्वाधिक सक्रिय रुग्ण पुण्यात

कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा झापाट्याने वाढू लागली आहे. त्यामुळे देशात तसेच, राज्यात ठिकठिकाणी लॉकडाऊन नियम कडक केले जात आहेत. देशातील एकूण सक्रिय रूग्णांपैकी एकट्या पुणे जिल्ह्यात सर्वाधिक सक्रिय रुग्णांची संख्या आहे. त्यामुळे पुणेकरांवर कोरोनाचा धोका कायम आहे.
 
देशातील कोरोना आकडेवारीनुसार, देशात सध्या 2 लाख 19 हजार 262 सक्रिय रुग्ण आहेत त्यापैकी पुणे जिल्ह्यात 21 हजार 653 सक्रिय रुग्ण आहेत. तर, पुणे विभागात (पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर) 25 हजार 482 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. पुण्यात दररोज नव्यांन वाढ होणाऱ्या रुग्णांची संख्या दीड ते दोन हजारांच्या दरम्यान आहे. त्यामुळे पुण्यात 12 मार्च रोजी पालिकेने लॉकडाऊन संदर्भात नवीन नियमाली जाहीर केली आहे.
 
देशात दररोज होणारी रूग्ण वाढ आता 25 हजाराच्या घरात गेली आहे. गेल्या 24 तासांत 26 हजार 291 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली असून 2021 या वर्षातील ही उच्चांकी वाढ आहे. महाराष्ट्रात सध्या 1 लाख 30 हजार 547 सक्रिय रुग्ण आहेत. तर, राज्यात दररोज नव्यानं वाढ होणाऱ्या रुग्णांची संख्या 15 हजारांच्या घरात आहे. महाराष्ट्राचा रिकव्हरी रेट 92.07 एवढा आहे तर, देशाचा रिकव्हरी रेट 96.68 टक्के आहे.