बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: शनिवार, 13 मार्च 2021 (16:05 IST)

बाप्प्परे, देशात आढळून येणाऱ्या प्रत्येक ५ रुग्णांपैकी ३ रुग्ण राज्यातले

महाराष्ट्रातील करोनाचा संसर्ग वेगानं फोफावत चालला आहे.रुग्णवाढीचा हा वेग कायम राहिल्यास पुढील काही दिवसांमध्ये राज्यात दररोज २० हजारांपर्यंत रुग्ण आढळून येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान, सध्या देशात आढळून येणाऱ्या प्रत्येक ५ रुग्णांपैकी ३ रुग्ण महाराष्ट्रातील आहेत.
 
निर्बंध शिथिल झाल्यानंतर आणि लसीकरणास प्रारंभ झाल्यानंतर लोकांकडून करोना प्रतिबंधात्मक उपायांकडे सर्रास दुर्लक्ष केलं जात असल्याचं चित्र आहे. सार्वजनिक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असून, मास्क वापराकडेही लोकांकडून काणाडोळा केला जात आहे. परिणामी गेल्या काही दिवसांपासून राज्यभर पुन्हा करोना संसर्गाने डोके वर काढले.
 
राज्यातील रुग्णसख्या वाढीचा वेग प्रचंड वाढला आहे. गुरुवारी देशभरात आढळून आलेल्या एकूण रुग्णांपैकी पहिल्यांदाच ६० टक्के रुग्ण महाराष्ट्रातील आहेत. देशभरात २३ हजार २८५ रुग्ण आढळून आले. तर महाराष्ट्रात १४ हजार ३१७ रुग्ण आढळू आले होते. शुक्रवारी ही संख्या आणखी वाढली. शुक्रवारी राज्यात १५,८१७ इतक्या नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली. यात मुंबईत १६४७, ठाणे जिल्हा १,१५३, नागपूरमधील १७२९ आणि पुण्यातील १८४५ रुग्णांचा समावेश आहे. कठोर निर्बंध लागू असलेल्या कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात शुक्रवारी ४१६ करोना रुग्ण आढळले आहेत.