Dharma Sangrah

Corona : अँटी कोरोना औषध DRDO 2-डीजी लॉन्च, रुग्णांवर कशा प्रकारे कार्य जाणून घ्या

Updated: सोमवार, 17 मे 2021 (12:18 IST)
 
राजनाथ सिंह यांच्या कार्यालयानं ट्वीट करून म्हटलं की, डीआरडीओच्या इन्स्टिट्यूट ऑफ न्यूक्लिअर मेडिसीन अँड अलाइड सायन्सेस (INMAS) या औषध उत्पादन करणाऱ्या विभागाने डॉक्टर रेड्डीज लॅबोरेटरीजसोबत मिळून 2-डीजी हे औषध विकसित केलं आहे.
 
2-DG औषधांच्या मेडिकल चाचण्या झाल्या आहेत आणि ज्या रुग्णांवर औषधांच्या चाचण्या झाल्या त्यांच्या प्रकृतीत वेगाने सुधारणा झाल्याचं दिसून आल्याचा दावा करण्यात आला आहे. इतकंच नाही तर हे औषध घेणाऱ्या रुग्णांना फारशी ऑक्सिजनचीही गरज पडली नसल्याचं आढळलं.
 
याशिवाय, हे औषध घेणाऱ्या रुग्णांची कोव्हिड आरटीपीसीआर चाचणी इतर रुग्णांच्या तुलनेत कमी दिवसात निगेटिव्ह येत असल्याचंही संशोधकांचं म्हणणं आहे. डीआरडीओच्या संशोधकांनी गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात या औषधावर काम सुरू केलं होतं. त्या प्रयोगात या औषधातले रेणू कोरोनाच्या Sars-CoV-2 विषाणूला आळा घालण्यात मदत करत असल्याचं आढळून आलं.
 
एप्रिल 2020 च्या प्रयोगाच्या आधारावर मे 2020 मध्ये औषधाच्या दुसऱ्या टप्प्याच्या चाचणीला परवानगी मिळाली होती.
 
डीआरडीओने डॉक्टर रेड्डीज लॅबच्या सहकार्याने कोव्हिड पॉझिटिव्ह रुग्णांवर या औषधाच्या क्लिनिकल चाचण्या सुरू केल्या. मे 2020 ते ऑक्टोबर 2020 या दरम्यान 2-DG औषधाच्या दुसऱ्या टप्प्याची चाचणी झाली.
 
या टप्प्यात रुग्णांसाठी हे औषध सुरक्षित असल्याचं म्हणजेच औषधामुळे कोव्हिड पॉझिटिव्ह रुग्णाला अपाय होत नसल्याचं आढळलं. शिवाय, त्यांच्या प्रकृतीत सुधारणाही आढळली.
 
देशभरातल्या 6 हॉस्पिटलमध्ये फेज-IIa च्या चाचण्या घेण्यात आल्या तर 11 हॉस्पिटल्समध्ये फेज-IIb च्या चाचण्या घेण्यात आल्या. फेज IIb मध्ये औषधाची मात्रा बदलण्यात आली होती. चाचणीच्या या दुसऱ्या टप्प्यात एकूण 100 कोव्हिड रुग्णांवर औषधाची चाचणी झाली.
 
चाचणीच्या दुसऱ्या टप्प्यात कोव्हिड रुग्णांवर सध्या जे उपचार करण्यात येतात त्या तुलनेत 2-DG औषध दिलेल्या रुग्णांमध्ये आजाराची लक्षणं लवकर बरी होत असल्याचं आढळलं. या औषधामुळे रुग्ण जवळपास अडीच दिवस आधी बरा होत असल्याचं दिसलं.

सर्व पहा

Pithori Amavasya Matrudin 2026 Wishes in Marathi पिठोरी अमावस्या शुभेच्छा संदेश

Haritalika 2026 : हरितालिकेच्या दिवशी चुकून सुद्धा करू नका हे 5 काम

कॉफी फक्त पिण्यासाठीच नाही तर ती घरगुती कामांसाठीही खूप उपयुक्त आहे! वाचा

नथीचा तोराच वेगळा! या गणेशोत्सवात ट्राय करा नथीचे हे खास आणि ट्रेन्डी प्रकार

घरातील या एका जागी चप्पल ठेवणे चुकीचे? काय सांगते वास्तुशास्त्र

सर्व पहा

'चौकीदार चोर आहे' पंतप्रधान मोदींना म्हटल्याबद्दल राहुल गांधींवरील मानहानीचा खटला रद्द करण्यास मुंबई उच्च न्यायालयाचा नकार

अमेरिका-इराण युद्ध तीव्र झाले; CENTCOM ने ५ इराणी तेलवाहू जहाजे नष्ट केली, जॉर्डनमधील अमेरिकी तळावर हल्ला

फडणवीस यांनी परीक्षेतील अनियमिततेवर कठोर भूमिका घेतली! महाराष्ट्रात एक उच्चस्तरीय कार्यदल विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधणार

गणेशोत्सवानिमित्त मुंबईकरांना मोठी भेट; ११ ते २७ सप्टेंबरपर्यंत शून्य टोल कर,फक्त लावा फक्त 'कोकण दर्शन' पास

पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमापूर्वी बनावट पीएमओ ओळखपत्रे आणि बंदुकीसह दोन संशयितांना अटक

पुढील लेख
Show comments