बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: बुधवार, 10 जून 2020 (12:38 IST)

आमच्या सर्कसमध्ये विदूषक हवाय- पवार

आमच्या सर्कसमध्ये प्राणी आहेत परंतु विदुषकाची कमतरता आहे अशा शब्दांत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. महाराष्ट्रातलं सरकार म्हणजे सर्कस आहे अशी टीका राजनाथ यांनी केली होती.  

दोन दशकांमध्ये राष्ट्रवादीने अनेक चढउतार पाहिले. स्वत:च्या सत्तेसाठी पक्ष सोडून गेले. त्याचा परिणाम पक्षावर झाला नाही. पक्षाचे कार्यकर्ते आपल्या बरोबर होते. राष्ट्रवादी हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. कार्यकर्त्यांमुळेच पक्ष कधीच संपला नाही असंही त्यांनी नमूद केलं.

निसर्ग चक्रीवादळाचा तडाखा बसलेल्या भागाचा दौरा शरद पवार यांनी केला. तेव्हा ते बोलत होते. शिवसेनेनेही राजनाथ यांच्या वक्तव्याला उत्तर दिलं आहे. राज्यात महाविकास आघाडीचं काम सुसुत्रतेने सुरू असून, उलटपक्षी गुजरातमध्येच सर्कस सुरू असल्याचं शिवसेनेचे माजी खासदार अरविंद सावंत यांनी म्हटलं आहे.