Marathi Biodata Maker

पुणे, मुंबई, आणि नागपूर रुग्ण संख्येत पुढेच पूर्ण राज्य रिपोर्ट

शनिवार, 5 सप्टेंबर 2020 (09:40 IST)
राज्यात आत्तापर्यंत १३ हजार २८९ रुग्ण बरे झाले. आतापर्यंत एकूण ६ लाख २५ हजार ७७३ रुग्ण बरे झाले असून राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७२.५१ टक्के आहे. आज १९ हजार २१८ नवीन रुग्णांचे निदान झाले. राज्यभरात आतापर्यंत सध्या २ लाख १० हजार ९७८ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी  दिली.
 
आत्तापर्यंत निदान झालेले १९,२१८ नवीन रुग्ण आणि नोंद झालेले ३७८ मृत्यू यांचा तपशील असा (कंसात आज नोंद झालेले मृत्यू) : मुंबई मनपा-१९२९ (३५), ठाणे- ३०४ (६), ठाणे मनपा-२९४ (१), नवी  मुंबई मनपा-५०१ (४), कल्याण डोंबिवली मनपा-५५८ (८), उल्हासनगर मनपा-२४ (१), भिवंडी निजामपूर मनपा-२५ (१), मीरा भाईंदर मनपा-२२८(१), पालघर-१९१ (४), वसई-विरार मनपा-२०६ (३), रायगड-५१८ (२), पनवेल मनपा-३१३ (१), नाशिक-१४२ (४), नाशिक मनपा-७०९ (१२), मालेगाव मनपा-४ (१), अहमदनगर-६६२ (९),अहमदनगर मनपा-१४५ (१२), धुळे-२२८ (२), धुळे मनपा-११९, जळगाव- ६१७ (५), जळगाव मनपा-१२० (३), नंदूरबार-८३ (१), पुणे- ८५८ (४०), पुणे मनपा-१६८९ (३८), पिंपरी चिंचवड मनपा-१०५३ (१७), सोलापूर-४२० (७), सोलापूर मनपा-४३ (५), सातारा-६८१ (१२), कोल्हापूर-५१५ (३०), कोल्हापूर मनपा-१५९ (१०), सांगली-३६५ (१४), सांगली  मिरज कुपवाड मनपा-३५६ (१०), सिंधुदूर्ग-१२९ (४), रत्नागिरी-८३ (४), औरंगाबाद-१९४ (२),औरंगाबाद मनपा-१४४ (३), जालना-१३७ (३), हिंगोली-४६ (१), परभणी-७०, परभणी मनपा-४९ (१), लातूर-२६८ (३), लातूर मनपा-१५७ (४), उस्मानाबाद-२१६ (१२), बीड-११० (६), नांदेड-२२९, नांदेड मनपा-१६४ (१), अकोला-४४, अकोला मनपा-१८ (१), अमरावती- ५८, अमरावती मनपा-९२, यवतमाळ-२०० (३), बुलढाणा-१२१ (१), वाशिम-७८ (२), नागपूर-३४८ (२), नागपूर मनपा-१५०० (२४), वर्धा-११७, भंडारा-११४, गोंदिया-१३२, चंद्रपूर-१४७, चंद्रपूर मनपा-७३, गडचिरोली-१७, इतर राज्य- २१ (२).
 
आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ४४ लाख ४४ हजार २४९ नमुन्यांपैकी ८ लाख ६३ हजार ०६२ नमुने पॉझिटिव्ह (१९.३२ टक्के) आले आहेत. राज्यात १४ लाख ५१ हजार ३४३ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ३६ हजार ७८३ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज ३७८ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.१ टक्के एवढा आहे. 

सर्व पहा

शनिदेवाच्या पूजेत तांब्याची भांडी का वापरू नयेत? नेमकं कारण काय?

जूनमध्ये गुरूचा महापरिवर्तन योग; ३ राशींचे भाग्य उजळणार

हॉटेलमधून मागवण्याऐवजी घरीच बनवा Restaurant Style Mix Veg

रक्तदाब नियंत्रणासाठी वेलची ठरते रामबाण? जाणून घ्या तिचे आश्चर्यकारक फायदे

Career in Polytechnic After 12th: बारावीनंतर या टॉप पॉलिटेक्निक कोर्समध्ये डिप्लोमा कोर्स करा

सर्व पहा

मुंबईत सीएनजी पुन्हा २ रुपयांनी महाग झाला, १७ दिवसांतील ही दुसरी दरवाढ

LIVE: रविवारी मध्य रेल्वेच्या मुख्य आणि हार्बर लाईनवर मेगा ब्लॉक लागू

अल्ट्राव्हायोलेट टेसेरॅक्ट स्टायलिश इलेक्ट्रिक स्कूटर २०२७ मध्ये लॉन्च होणार

पद्मविभूषण तीजन बाई यांची प्रकृती खालावली एमआयसीयूमध्ये दाखल

पुनर्मूल्यांकन आणि पडताळणी प्रक्रिया केव्हा सुरू होईल, याबाबत CBSE ने एक सूचना जारी केली

पुढील लेख
Show comments