गोव्याच्या मुख्यमंत्र्यांना करोनाची लागण
गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना करोनाची लागण झाली आहे. प्रमोद सावंत यांनी स्वत: ट्विट करत ही माहिती दिली आहे. सावंत घरातच विलगीकरणात राहत आहे. आपल्या संपर्कात आलेल्या सर्वांना त्यांनी योग्य ती काळजी घेण्यात आवाहन ट्विटरच्या माध्यमातून केलं आहे.
प्रमोद सावंत यांनी ट्विट करत म्हटलं की, “मी तुम्हा सर्वांना कळवू इच्छितो की, मला करोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे. मला करोनाची कोणतीही लक्षणं आढळत नसून घराचत विलगीकरणात राहत आहे. सध्या मी घरातूनच काम करत आहे. माझ्या जवळच्या संपर्कात आलेल्या सर्वांनी योग्य ती काळजी घ्यावी”.
गोव्यात आजपासून सीमा खुल्या करण्यात आल्या आहेत.