रविवार, 4 डिसेंबर 2022
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified गुरूवार, 25 जून 2020 (10:14 IST)

वाचा, या आहेत कोवीड -१९ च्या औषधे

कोवीड -१९ च्या उपचारासाठी कोविफोर अँटीवायरल औषधाच्या २०,००० बाटल्या वितरीत करण्यास तयार आहे, असे औषधनिर्माण कंपनी हेटरो हेल्थकेअरने बुधवारी सांगितले. कोविफोर औषधाची एक बाटलीची किंमत ५ हजार ४०० रुपये इतकी असणार आहे. त्यापैकी हैदराबाद, दिल्ली, गुजरात, तामिळनाडू, मुंबई आणि महाराष्ट्राच्या इतर भागात त्वरित पुरवण्यात येणार आहे. तर आणखी एका आठवड्यात कोलकाता, इंदूर, भोपाळ, लखनऊ, पाटणा, भुवनेश्वर, रांची, विजयवाडा, कोचीन, त्रिवेंद्रम आणि गोवा येथे दूसऱ्या लॉटमध्ये औषधांचा पुरवठा केला जाईल.
 
देशभरातील सार्वजनिक आणि खासगी आरोग्य सेवांसाठी ‘कोविफर’लवकरात लवकर उपलब्ध होण्यासाठी कंपनी सरकार आणि वैद्यकीय समुदायाशी जवळून काम करत आहे. निवेदनात म्हटले आहे की, कोविफोर हे प्रौढ आणि मुलांमधील कोविड -१९ रूग्णांवर उपचार करण्यासाठी वापरला जाणारा उपायांचा पहिला सर्वसामान्य ब्रँड आहे. हे औषध १०० मिलीग्राम कुपी (इंजेक्शन) म्हणून उपलब्ध असेल.
 
कोविड -१९ वरील उपचारासाठी फॅबीफ्लू (FabiFlu)या ब्रँडखाली भारतात अँटीव्हायरल औषध फॅविपिरावीर (Favipiravir)लाँच केले आहे. हे औषध कोविड-१९ च्या रूग्णांसाठी आहे. तसेच ज्या रूग्णांमध्ये कोरोनाचे सौम्य आणि मध्यम लक्षणे असतील अशा रूग्णांच्या उपचाराकरता हे औषध वापरले जाईल, असे ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्सने सांगितले आहे.
 
मुंबईतील या फार्मा कंपनीला औषध निर्मितीसाठी व बाजारपेठेत ते उपलब्ध करण्यासाठी शुक्रवारी ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DCGI)कडून शुक्रवारी मान्यताही देण्यात आली आहे.