शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: सोमवार, 15 जून 2020 (09:18 IST)

'या' दानशूर उद्योगपतीने उभारले देशातील पहिले कोरोना हेल्थ सेंटर

विप्रोचे संस्थापक अझीम प्रेमजी यांनी काही दिवसांपूर्वी याच प्रेमजींनी दिलेल्या शब्द खरा केला आहे. प्रेमजी यांनी भारतातील पहिले केवळ कोरोना संसर्गा विरोधात लढण्यासाठी रुग्णालय उभारलं आहे.
 
पुण्यातल्या या रुग्णालयामध्ये ४५० अद्ययावत बेड्स आणि १८ व्हेंटिलेटर व आयसीयू विभाग असणार आहे. येथे सार्वजनिक-खाजगी सहकार्यातून उपचार करण्यात येतील. विप्रो दोन सुसज्ज अँब्युलन्स पुरवत असून आहे. हे रुग्णालय कोरोना हेल्थ सेंटर म्हणून ओळखले जाईल असं म्हटलं आहे. सदर रुग्णालय पुण्यातील हिंजवडी भागात तयार करण्यात आले आहे. या ठिकाणी आयटी पार्क असून, विप्रोची भलीमोठी आयटी कंपनीची इमारत आहे. यामधील १.८ लाख वर्गफूटची जागा या रुग्णालयासाठी देण्यात आली आहे. विप्रोने ५ मे रोजी राज्य सरकारसोबत सामंजस्य करार केला होता. त्यावेळेस त्यांनी दीड महिन्यात कोरोना संसर्गाशी लढण्याकरिता रुग्णालय उभारणार असल्याचे सांगितले होते.
 
रुग्णालयाची वैशिष्ट्ये
४५० खाटांचे हे विशेष रुग्णालय महिन्याच्या अखेरीस तयार होईल आणि मध्यम प्रकारच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी सज्ज असेल. गंभीर स्वरुपातील रुग्णांना तिसऱ्या टप्प्यातील वैद्यकीय सेवा केंद्रात हलवण्यापूर्वी त्यांची प्रकृती स्थिर करण्यासाठी या विशेष रुग्णालयात १२ खाटा उपलब्ध असतील. हे रुग्णालय कोविड-१९ साठी समर्पित असे स्वतंत्र कॉम्प्लेक्स आहे. येथील नियुक्त डॉक्टर्स आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या निवासासाठी या संकुलात २५ उत्तम खोल्यांची व्यवस्था करण्यात आली आहे.