Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

लॉकडाऊन हे पॉज बटण, समाधान नाही : राहुल गांधी

Updated: गुरूवार, 16 एप्रिल 2020 (16:49 IST)
 
कोरोना रोखण्यासाठी सरकारने लॉकडाऊन जाहीर केला. मात्र लॉकडाऊन हे पॉज बटण आहे. ते समाधान नाही. व्हायरस पसरण्यापासून आपण फक्त थोड्या कालावधीसाठी पॉज करत आहोत. जेव्हा लॉकडाऊन उठवले जाईल. तेव्हा विषाणू पुन्हा पसरायला सुरुवात करेल. मग अशा परिस्थितीमध्ये आपल्याला काय करायला हवे. तर आपल्याला आरोग्य सुविधा चांगल्या करायला हव्यात, असे राहुल गांधी यांनी सांगितले.
 
राहुल गांधी म्हणाले की, “कोरोना व्हायरसला हरविणारे सर्वात मोठे शस्त्र काय आहे? तर कोरोना टेस्टिंग करणे. आपण जास्तीत जास्त टेस्ट केल्या तर व्हायरस कुठून कुठे पसरत चाललाय हे कळू शकते. गेल्या काही दिवसांतील टेस्टची आकडेवारी पाहिले तर भारतातील सर्व जिल्ह्यांची सरासरी नुसार फक्त ३०० टेस्ट प्रति जिल्हा झालेल्या आहेत. जो पुरेसा नाही. सध्या आपण व्हायरस जिथे आढळतोय, तिथेच चाचण्या घेत आहोत. माझी मागणी आहे की, टेस्ट वाढवल्या पाहीजेत. रणनीती आखून टेस्ट वाढवल्या पाहीजेत.”
 
आपल्याकडे अन्नधान्याची कमतरता काही दिवसांनी येणार आहे. अर्थव्यवस्था कोसळणार आहे. छोट्या उद्योगांना उतरती कळा लागणार आहे. हे प्रश्न इतर कोरोनाग्रस्त राष्ट्रात नाहीत. त्यामुळे भारताला कोरोना संकटाचा सामना करताना या प्रश्नांचा देखील सामना करावा लागणार आहे. आज आपण कोरोनावर विजय मिळवला असे बोलू शकत नाही. आता कुठे ही लढाई सुरु झाली असून ही लढाई लांबपर्यंत चालणार असल्याचे राहुल गांधी म्हणाले.

सर्व पहा

साप्ताहिक राशीभविष्य ३० ऑगस्ट ते ५ सप्टेंबर २०२६

TVS iQube MillionR Edition लॉन्च 145 किमी रेंज आणि टाइप-सी चार्जिंग यांसारखी वैशिष्ट्ये

श्रावणातील आदित्यराणूबाई व्रत पूजा पद्धत आणि माहिती

मंगळागौर व्रत किती वर्षे करावे? जाणून घ्या परंपरा आणि नियम

September 2026 Monthly Horoscope सप्टेंबर २०२६ चे मासिक राशीभविष्य: जाणून घ्या कसा राहील हा महिना तुमच्यासाठी!

सर्व पहा

गोंदियामध्ये लाडकी बहिण योजनेसाठीचे २६,९२७ अर्ज फेटाळण्यात आले

दिल्लीतील सत्य निकेतनमध्ये एक इमारत कोसळली; ढिगाऱ्याखाली अनेक जण अडकल्याची भीती; बचावकार्य सुरू

LIVE: गणेशोत्सवासाठी अकोला प्रशासन सतर्क, एक खिडकी योजना राबवली जाणार

मुंबईत मोबाईलच्या गोदामाला भीषण आग, सुदैवाने जनहानी नाही

पैलवान अश्विनी पौळच्या तिसऱ्या मुलाचेही निधन

पुढील लेख
Show comments