शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: सोमवार, 30 मार्च 2020 (11:15 IST)

लॉकडाऊनबाबत केंद्र सरकारचे मोठे विधान, 14 एप्रिलपासून वाढविण्याची कोणतीही योजना नाही

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी 21 दिवसांचा लॉकडाउन लागू केला आहे. जरी काही अहवाल असे नमूद करतात लॉकडाउन मुदत वाढू शकते. त्यावर कॅबिनेट सचिव राजीव गौबा म्हणतात की 21 दिवसांच्या लॉकडाउन मुदत वाढविण्याची सरकारची कोणतीही योजना नाही
आहे. 
 
सोमवारी कॅबिनेट सचिव राजीव गौबा म्हणाले, 'असे अहवाल वाचून मला आश्चर्य वाटले. लॉकडाऊन वाढविण्याची कोणतीही योजना नाही. ' पंतप्रधानांनी 24 मार्चला लॉकडाउनची घोषणा केली होती जी 14 एप्रिल रोजी संपत आहे.
 
स्थलांतरित मजुरांचे प्रचंड स्थलांतर लक्षात घेता सरकारने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना लॉकडाऊन काटेकोरपणे लागू करण्यास सांगितले आहे. लॉकडाऊन कार्यान्वित करण्यासाठी आणि प्रवासी मजुरांना लॉकडाऊन कालावधीत अडचणी येऊ नयेत यासाठी सरकारने स्थानिक अधिकार्यां्द्वारे बरीच नियमांची अंमलबजावणी केली आहे
 
कोविड - 19 प्रतिसाद उपक्रमांच्या आखणी व अंमलबजावणीसाठी सरकारने 11 मजबूत गट स्थापन केले आहेत. या 11 संघात 80 वरिष्ठ नागरी सेवक असतील. गेल्या आठवड्यात गौबा यांनी राज्याच्या मुख्य सचिवांना आणि केंद्रशासित प्रदेशांच्या प्रशासकांना 18 जानेवारीपासून 1.5 लाखाहून अधिक आंतरराष्ट्रीय प्रवाशांशी संपर्क साधला आहे.