Dharma Sangrah
✕

दासबोध दशक सतरावा - प्रकृतिपुरुषाचा

Updated: शनिवार, 15 ऑक्टोबर 2022 (17:11 IST)
 
 
समास दहावा : टोणपसिद्धलक्षण
 
॥ श्रीराम ॥ आवर्णोदकीं हटकेश्वर । त्यास घडे नमस्कार । महिमा अत्यंतचि थोर । तया पाताळलिंगाचा ॥ १ ॥ परंतु तेथें जाववेना । शरीरें दर्शन घडेना । विवेकें आणावें अनुमाना । तया ईश्वरासी ॥ २ ॥ सातां समुद्रांचे वेडे । उदंड भूमि पैलिकडे । सेवटीं तुटले कडे । भूमंडळाचे ॥ ३ ॥ सात समुद्र वोलांडावे । तेथें जाणें कैसें फावे । म्हणोन विवेकी असावे । साधुजन ॥ ४ ॥ जें आपणास नव्हे ठावें । तें जाणतयास पुसावें । मनोवेगें तनें फिरावें । हें तों घडेना ॥ ५ ॥ जें चर्मदृष्टीस नव्हे ठावें । तें ज्ञानदृष्टीनें पाहावें । ब्रह्मांड विवरोन राहावें । समाधानें ॥ ६ ॥ मध्यें आहे भूमीचें चडळ । म्हणौन आकाश आणि पाताळ । तें चडळ नस्तां अंतराळ । चहुंकडे ॥ ७ ॥ तयास परब्रह्म म्हणावें । जें उपाधीवेगळें स्वभावें । जेथें दृश्यमायेच्या नांवें । सुन्याकार ॥ ८ ॥ दृष्टीचें देखणें दृश्य । मनाचें देखणें भास । मनातीत निराभास । विवेकें जाणावें ॥ ९ ॥ दृश्य भास अवघा विघडे । विवेक तेथें पवाडे । भूमंडळीं ज्ञाते थोडे । सूक्ष्मदृष्टीचे ॥ १० ॥ वाच्यांश वाचेनें बोलावा । न बोलतां लक्ष्यांश जाणावा । निर्गुण अनुभवास आणावा । गुणाचेनयोगें ॥ ११ ॥ नाना गुणास आहे नाश । निर्गुण तें अविनाश । ढोबळ्याहून विशेष । सूक्ष्म देखणें ॥ १२ ॥ जें दृष्टीस न पडे ठावें । तें ऐकोन जाणावें । श्रवणमननें पडे ठावें । सकळ कांहीं ॥ १३ ॥ अष्टधेचे जिनस नाना । उदंड पाहातां कळेना । अवघें सगट पिटावेना । कोणियेकें ॥ १४ ॥ सगट सारिखी स्थिती जाली । तेथें परीक्षाच बुडाली । चविनटानें कालविलीं । नाना अन्नें ॥ १५ ॥ टोणपा नव्हे गुणग्राहिक । मुर्खास कळेना विवेक । विवेक आणि अविवेक । येकचि म्हणती ॥ १६ ॥ उंच नीच कळेना ज्याला । तेथें अभासचि बुडाला । नाना अभ्यासें प्राणियाला । सुटिका कैंची॥ १७ ॥ वेड लागोन जालें वोंगळ । त्यास सारिखेंच वाटे सकळ । तें जाणावें बाश्कळ । विवेकी नव्हेती ॥ १८ ॥ ज्यास अखंड होतो नाश । त्यासीच म्हणती अविनाश । बहुचकीच्या लोकांस । काये म्हणावें ॥ १९ ॥ ईश्वरें नाना भेद केले । भेदें सकळ सृष्टी चाले । आंधळे परीक्षवंत मिळाले । तेथें परीक्षा कैंची ॥ २० ॥ जेथें परीक्षेचा अभाव । तो टोणपा समुदाव । गुणचि नाहीं गौरव । येईल कैंचें ॥ २१ ॥ खरें खोटें येकचि जालें । विवेकानें काय केलें । असार सांडून सार घेतलें । साधुजनीं ॥ २२ ॥ उत्तम वस्तूचि परीक्षा । कैसी घडे नतद्रक्षा । दीक्षाहीनापासीं दीक्षा । येईल कैंची ॥ २३ ॥ आपलेन वोंगळपणें । दिशाकरून शौच्य नेणे । वेद शास्त्रें पुराणें । त्यास काये करिती ॥ २४ ॥ आधीं राखावा आचार । मग पाहावा विचार। आचारविचारें पैलपार । पाविजेतो ॥ २५॥ जे नेमकास न कळे । तें बश्कळास केवी कळे । डोळस ठकती आंधळे । कोण्या कामाचे ॥ २६ ॥ पापपुण्य स्वर्ग नर्क । अवघेंच मानिलें येक । विवेक आणी अविवेक । काये मानावें ॥ २७ ॥ अमृत विष येक म्हणती । परी विष घेतां प्राण जाती । कुकर्में होते फजिती । सत्कर्में कीर्ति वाढे ॥ २८ ॥ इहलोक आणि परलोक । जेथें नाहीं साकल्प विवेक । तेथें अवघेच निरार्थक । सकळ कांहीं ॥ २९ ॥ म्हणौन संतसंगेंचि जावें । सत्शास्त्रचि श्रवण करावें । उत्तम गुणास अभासावें । नाना प्रयेत्‌नें ॥ ३० ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे टोणपसिद्धलक्षणनाम समास दहावा ॥ ॥ दशक सतरावा समाप्त ॥

सर्व पहा

देवांना अत्यंत प्रिय असणाऱ्या या फुलांच्या माळा अर्पण करा; मिळवा विशेष आशीर्वाद!

गणेशोत्सव १० दिवसांचाच का असतो? बाप्पाच्या पाहुणचाराशी आणि महाभारताशी संबंधित ही आकर्षक कथा वाचा

नीम करोली बाबा पुण्यतिथी Neem Karoli Baba death anniversary

Mahalakshmi Mantra देवी लक्ष्मीचे ६ चमत्कारी मंत्र: संपत्ती, समृद्धी आणि आशीर्वाद मिळविण्यासाठी अचूक उपाय

Modak Variety गणेशोत्सव विशेष गणपती बाप्पासाठी खास ट्रेंडिंग मोदकाचे प्रकार

सर्व पहा

Pithori Amavasya Matrudin 2026 Wishes in Marathi पिठोरी अमावस्या शुभेच्छा संदेश

Haritalika 2026 : हरितालिकेच्या दिवशी चुकून सुद्धा करू नका हे 5 काम

कॉफी फक्त पिण्यासाठीच नाही तर ती घरगुती कामांसाठीही खूप उपयुक्त आहे! वाचा

नथीचा तोराच वेगळा! या गणेशोत्सवात ट्राय करा नथीचे हे खास आणि ट्रेन्डी प्रकार

घरातील या एका जागी चप्पल ठेवणे चुकीचे? काय सांगते वास्तुशास्त्र

पुढील लेख