बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. दासनवमी
Written By
Last Updated : मंगळवार, 14 फेब्रुवारी 2023 (22:13 IST)

Samarth Ramdas swami Biography In Marathi समर्थ रामदास स्वामी यांची संपूर्ण माहिती

ramdas swami
महाराष्ट्रातील संत कवी व समर्थ संप्रदाचे संस्थापक समर्थ रामदास हे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरू होते आणि त्यांना महाराष्ट्राचे महान संत मानले जाते. समर्थ रामदास लहानपणापासूनच रामभक्तीत सामील झाले होते. त्यानंतर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या साम्राज्यात हिंदू धर्माचा प्रचार केला. दक्षिण भारतात हनुमानाचा अवतार म्हणून त्यांची पूजा केली जाते. अनेक पुस्तकांचे लेखन त्यांनी लिहिले होते. मुख्य ग्रंथ  ‘मनाचे श्लोक’ आणि "दासबोध" हा मराठी भाषेत लिहिलेला प्रसिद्ध ग्रंथ आहे. समर्थ रामदासांचा समाधी दिवस "दास नवमी" म्हणून साजरा केला जातो.
 
समर्थ रामदासांचा जन्म 1608 मध्ये जालना जिल्ह्यातील जांब येथे चैत्र शुद्ध नवमीस रामनवमीच्या दिवशी महाराष्ट्रातील जालना गावात ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव सूर्याजीपंत आणि आईचे नाव राणूबाई होते. समर्थ रामदासांचे खरे नाव 'नारायण सूर्याजीपंत ठोसर' होते. त्याचे वडील सूर्यदेवाचे उपासक होते आणि गावातील पटवारी म्हणून काम करायचे. ब्राह्मण कुटुंबातील असल्याने वडील सूर्याजीपंत त्यांचा जास्तीत जास्त वेळ उपासना आणि धार्मिक विधी करण्यात घालवत असत. अशाप्रकारे नारायण (समर्थ रामदास) यांना त्यांच्या कुटुंबाकडून बालपणीच हिंदू धर्माचे शिक्षण मिळाले. कुटुंबात मोठे  भाऊ गंगाधर हे ही हे विद्वान होते.
 
नारायण (समर्थ रामदास) लहानपणी खूप खोडकर होते. ते  दिवसभर गावात फिरायचे ,खेळायचे  गावातील लोक दररोज त्यांच्याविषयीच्या तक्रारी त्यांच्या आईजवळ घेऊन येत असत. रोजच्या तक्रारींनी त्रासलेल्या त्यांच्या आईने (राणुबाई) नारायणला (बालपणातील नाव) समजावले की, ''तू दिवसभर फक्त दुसर्‍यांच्या खोड्या काढीत असतोच त्यापेक्षा काही काम करीत जा. गंगाधर (मोठा भाऊ) बघ कुटुंबाची किती काळजी घेतो.''आईची ही गोष्ट  नारायणच्या मनात घर करून गेली आणि दुसऱ्या दिवसापासून ते ध्यान करू लागले .
 
दुस-या दिवशी आई राणूबाईला नारायण घरभर कुरबुरी करताना दिसला नाही, तेव्हा ती अस्वस्थ झाली, आई आणि भाऊ गावात नारायणला शोधायला निघाले. दिवसभर शोधाशोध करूनही नारायण सापडले  नाही. सायंकाळी अचानक आपल्या खोलीत ध्यानस्थ बसलेल्या नारायणाकडे आईचे लक्ष गेले. आईने त्यांना बाळ  काय करीत आहेस? अशी विचारणा केली. तेव्हा नारायणने उत्तर दिले, ''मी पूर्ण विश्वाची काळजी करीत आहे.'' (दास डोंगरी राहतो चिंता विश्वाची वाहतो)
 
त्या दिवसापासून नारायणचे आयुष्य पूर्णपणे बदलून गेले. त्यांनी लोकांना आरोग्य आणि धार्मिक ज्ञान देण्यास सुरुवात केली. युवाशक्तीनेच सशक्त राष्ट्र निर्माण होऊ शकते, असे त्यांनी तरुण वर्गाला सांगितले. त्यांनी ठिकठिकाणी व्यायाम व व्यायामासाठी व्यायामशाळा स्थापन करून हनुमानजींची नित्यनियमाने मूर्तीची प्रतिष्ठापना करण्याचा सल्ला दिला.देशात चेतना निर्माण होण्याच्या दृष्ट्रीने त्यांनी जागो-जागी मारूतीची मंदिरे स्थापिली. जागोजागी मठ बांधले.
 
वयाच्या बाराव्या वर्षी स्वत:च्या विवाहाच्यावेळी ‘सावधान’शब्द ऐकताच रामदासांनी तेथून पलान केले. नाशिकमध्ये टाकळी येथे त्यांनी 12 वर्षे रामनामाचा जप करीत तपशर्च्या केली. त्यानंतर 12 वर्षे संपूर्ण भारत भ्रमण केले. आणि 12 वर्षे त्यांनी स्वत:ला मर्यादा पुरुषोत्तम श्री राम यांच्या उपासनेत गुंतवून ठेवले. त्यावेळी ते स्वतःला रामाचा दास म्हणवत असत, म्हणूनच त्यांचे नाव "रामदास" असे झाले.
 
12 वर्षे कठोर तपश्चर्या केल्यानंतर त्यांना रामाचे दर्शन झाले. जेव्हा त्यांना साक्षात्कार झाला तेव्हा ते फक्त 24 वर्षांचे होते . त्यानंतर ते पुढील बारा वर्षांच्या भारत दौऱ्यावर निघाले.
भारत भेटीदरम्यान समर्थ रामदासांनी श्रीनगरमध्ये शीखांचे चौथे गुरू हरगोविंदजी यांची भेट घेतली. गुरू हरगोविंदजी त्यांना मुघल साम्राज्यातील लोकांच्या दुर्दशेबद्दल सांगितले  मुघल राजांनी प्रजेवर केलेले अत्याचार आणि सामान्य जनतेची आर्थिक स्थिती पाहून समर्थ रामदासांचे हृदय संतापाने भरून आले. त्यानंतर त्यांनी आपल्या जीवनाचे ध्येय मोक्षप्राप्तीपासून ते स्वराज्य स्थापनेपर्यंत बदलले. त्यानंतर त्यांनी भारतभर जनतेला संघटित करून मुघलांच्या  राजवटीतून मुक्ती मिळवण्यासाठी उपदेश करण्यास सुरुवात केली.
 
यादरम्यान त्यांनी काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत एकूण 1100 मठ आणि आखाडे स्थापन केले. ज्यामध्ये लोकांना स्वत:ला सशक्त बनवून गुन्हेगारी आणि अत्याचारांपासून दूर राहण्याची शिकवण दिली. हे उद्दिष्ट साध्य करतानात्यावेळी महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी राजांचा उदय होत होता. छत्रपती शिवाजी महाराज रामदास स्वामींच्या कार्याने अत्यंत प्रभावित झाले होते. रामदासांची भेट झाली तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी आपले राज्यच रामदास स्वामींच्या स्वाधीन करण्याचा मनोदय व्यक्त केला. .
 
त्यावेळी समर्थांनी महाराजांना सांगितले, ''हे राज्य तुमचेही नाही आणि माझेही नाही, हे राज्य परमेश्वराचे आहे.'' छत्रपती शिवाजी महाराज वेळोवेळी त्यांच्याशी सल्ला-मसलत करीत असत.
 
रामदासांच्या छत्रपती शिवाजीशी झालेल्या या भेटीनंतर, छत्रपती शिवाजी महाराजांनी  स्वराज्य स्थापनेचे स्वप्न साकार केले आणि संपूर्ण दक्षिण भारतात मराठा साम्राज्याचा विस्तार केला .
 
गुरु रामदासांनी आयुष्यातील शेवटचे क्षण मराठा साम्राज्याच्या साताराजवळील परळी किल्ल्यावर घालवले. हा किल्ला आता सज्जनगडचा किल्ला म्हणूनही ओळखला जातो. तामिळनाडूतील अरणीकर या अंध कारागीराच्या हाताने बनवलेले राम, सीता आणि लक्ष्मण यांच्या मूर्ती समोर, समर्थ रामदासांनी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या नवमीला पाच दिवस निर्जला उपवास केला. 2 फेब्रुवारी 1681 रोजी ते सज्जनगड जिल्हा सातारा येथे ब्रह्मसमाधीत तल्लीन झाले. त्यांच्या समाधीवेळी त्यांचे वय 73 वर्षाचे होते.
 
त्यांची समाधी सज्जनगड येथे ब्रह्मसमाधीच्या ठिकाणी आहे. त्यांचा निर्वाण दिवस दास नवमी म्हणून साजरा केला जातो . दरवर्षी या दिवशी देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक येथे पोहोचतात आणि दर्शन घेतात. दरवर्षी समर्थांचे भक्त भारताच्या विविध प्रांतातून दोन आठवड्याचा दौरा काढतात आणि त्यावेळी मिळालेल्या भिक्षेतून सज्जनगडची व्यवस्था चालते.

Edited By - Priya Dixit