suvichar

दत्तात्रय गुरु तुम्हीच ना!

Updated: बुधवार, 16 एप्रिल 2025 (17:51 IST)
चतुर्थाश्रमा जीर्णोद्धारा, आश्रम घेऊनी तुम्हीच ना ?
कृष्ण सरस्वती सद्गुरू वंदुनी, तीर्था गमले तुम्हीच ना ?
माधवारण्य कृतार्थ केला, आश्रम देऊनी तुम्हीच ना ?
पोटशुळाची व्यथा हरोनी, विप्र सुखविला तुम्हीच ना ?
वेल उपटुनी विप्रा दिधला, हेमकुंभ गुरु तुम्हीच ना ?
तस्कर वधूनि विप्र रक्षिला, भक्तवत्सला तुम्हीच ना ?
विप्रस्त्रियेचा पुत्र उठविला, निष्ठा देखुनी तुम्हीच ना ?
हीनजिव्हा वेदपाठी केला, सजीव करुनी तुम्हीच ना ? 
वाडी नरसिंह औदुंबरही, वास्तव्य करुनी तुम्हीच ना ?
भीमा-अमरजा संगमी आले, गाणगापुरी गुरु तुम्हीच ना ?
राममुहूर्ती संगमस्थानी, अनुष्ठानी रत तुम्हीच ना ?
भिक्षा ग्रामी करुनी राहतां, माध्याह्नी मठीं तुम्हीच ना ?
ब्रह्मराक्षसा मोक्ष देऊनी, उद्धरिले मठीं तुम्हीच ना ?
वांझ महिषी दुभविली, फुलविले शुष्क काष्ठ गुरु तुम्हीच ना ?
नंदीनामा कुष्ठी केला, दिव्यदेही गुरु तुम्हीच ना ?
त्रिविक्रमा विश्वरूपा दाऊनी, कुमसी ग्रामी तुम्हीच ना ?
अगणित दिधले धान्य कापुनी, शूद्रा क्षेपुर तुम्हीच ना ?
रत्नाईचे कुष्ठ दवडिले, तीर्थे वर्णित तुम्हीच ना ?
आठही ग्रामी भिक्षा केली, दीपवाळी दिनी तुम्हीच ना ?
भास्कर हस्ते चार सहस्रा, भोजन दिधले तुम्हीच ना ?
निमिषमात्रे तंतुक नेला, श्रीशैल्यासी तुम्हीच ना ?
सायंदेवां काशीयात्रा, दाखविली गुरु तुम्हीच ना ?
चांडाळा मुखी वेद वदविले, गर्व हराया तुम्हीच ना ?
साठ वर्षे वांझेसी दिधले, कन्यापुत्रही तुम्हीच ना ?
कृतार्थ केला मानसपूजनी, नरकेसरी गुरु तुम्हीच ना ?
माहूरचा सतिपती उठवोनी, धर्म कथियला तुम्हीच ना ?
रजकाचा यवनराज बनवुनी, उद्धरिला गुरु तुम्हीच ना ?
अनन्यभावे भजता सेवक, तरतिल वदले तुम्हीच ना ?
कर्दळीवनीचा बहाणा करुनी, गाणगापुरी स्थित तुम्हीच ना ?
निर्गुण पादुका दृष्य ठेवूनि, गुप्त स्वामी मठी तुम्हीच ना ?
विठाबाईचा दास मूढ परि, अंगीकारिला तुम्हीच ना ?
आत्मचिंतनी रमवा निशिदिनी, दीनानाथ गुरु तुम्हीच ना ?

सर्व पहा

Vishwakarma Jayanti 2026 Wishes in Marathi विश्वकर्मा जयंती शुभेच्छा मराठी

Gauri Geete in Marathi गौरी गणपतीची गाणी

श्री गणेशाच्या नैवेद्यासाठी केशरी खव्याचे लाडू, गणपती उत्सवामध्ये नक्की ट्राय करा

Jyeshta Gauri Aarti in Marathi ज्येष्ठा गौरी आरती

भक्तवत्सल व प्रेमळ गणपती श्री बल्लाळेश्वर, भक्ताच्या नावावरून गणेशाचं नाव

सर्व पहा

Ganesh Chaturthi 2026 Sthapana Shubh Muhurat: १४ सप्टेंबर रोजी गणपती स्थापना शुभ मुहूर्त

देवांना अत्यंत प्रिय असणाऱ्या या फुलांच्या माळा अर्पण करा; मिळवा विशेष आशीर्वाद!

गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी ३ प्रकारच्या चॉकलेट मोदकांची रेसिपी

कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी रोजच्या आहारात हे पदार्थ खा; हाडे आणि दात राहतील मजबूत!

खाऊन योग करणे योग्य आहे की अयोग्य, जेवणानंतर योगा करण्याचे परिणाम जाणून घ्या

पुढील लेख
Show comments