सोमवार, 6 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. दीपावली
Written By
Last Modified: गुरूवार, 5 नोव्हेंबर 2020 (16:52 IST)

दिवाळी साजरी करण्या मागील 15 खास कारणे, या दिवशी करतात कालिकेची पूजा

दिवाळी हा सण हिंदूंचा मोठा सण आहे. हा सण अवघ्या 5 दिवसाचा असतो. आश्विन कृष्णपक्षाच्या द्वादशी पासून हा सण सुरू होऊन कार्तिक शुक्ल पक्षाचा द्वितीयेपर्यंत दणक्यात साजरा केला जातो. आतिषबाजी, फुलबाज्या लावतात, घराबाहेर सडा रांगोळी करतात, दिव्यांनी घराला उजळून काढतात. सर्वीकडे एक चैतन्यमयी आणि आनंदी वातावरण असतं. चला जाणून घेऊ या की हा सण कोणत्या कारणास्तव साजरा करतात.
 
1 या दिवशी भगवान विष्णूंनी राजा बळीला पाताळ लोकाचे स्वामी बनविले होते आणि इंद्राने स्वर्गाला सुरक्षित असल्याचे समजून दिवाळी सण साजरा केला होता.
 
2 याच दिवशी भगवान विष्णूंनी नरसिंह रूप घेऊन हिरण्यकश्यपाचे वध केले होते.
 
3 याच दिवशी समुद्रमंथनाच्या नंतर देवी लक्ष्मी आणि धन्वंतरी प्रकटले होते. याच दिवशी देवी काली देखील प्रकटल्या होत्या म्हणून बंगाल मध्ये दिवाळीच्या दिवशी देवी कालिकेची पूजा केली जाते.
 
4 याच दिवशी भगवान राम 14 वर्षाच्या वनवासानंतर अयोध्येला परतले होते. अशी आख्यायिका आहे की भगवान राम रावणाचा वध करून 21 दिवसानंतर अयोध्येला परतले म्हणून त्यांचा विजयोत्सवाच्या निमित्ताने घरो-घरी दिवे लावतात.
 
5 दिवाळीच्या आदल्या दिवशी श्रीकृष्णाने नरकासुर नावाच्या राक्षसाचे वध केले होते. या आनंददायी प्रसंगी दुसऱ्या दिवशी दिवे लावले जातात.
 
6 हा दिवस भगवान महावीर स्वामींचा निर्वाण दिन देखील आहे. जैन मंदिरात निर्वाण दिन साजरा करण्यात येतो. 
 
7 गौतम बुद्धाचे अनुयायींनी तब्बल 2500 वर्षांपूर्वी गौतम बुद्धांच्या स्वागता प्रीत्यर्थ लाखो दिवे लावून दिवाळीचा सण साजरा केला होता.
 
8 याच दिवशी उज्जैनचे राजा विक्रमादित्याचा राज्याभिषेक झाला होता.
 
9 याच दिवशी गुप्तवंशीय राजा चंद्रगुप्त विक्रमादित्याने विक्रम संवताच्या स्थापनेसाठी धर्म, ज्योतिषाच्या नामांकित विद्वानांना आमंत्रित करून मुहूर्त काढले होते. 
 
10 याच दिवशी अमृतसर येथे 1577 मध्ये स्वर्ण मंदिराची स्थापना केली गेली.
 
11 याच दिवशी शिखांचे सहावे गुरु गोविंद सिंह यांची तुरुंगातून सुटका झाली होती. 
 
12 याच दिवशी आर्य समाजाचे संस्थापक महर्षी दयानंद सरस्वती यांचे निर्वाण झाले. 

13 याच दिवशी नेपाळ संवत मध्ये नवीन वर्षाची सुरुवात होते.
 
14 भगवान विष्णू यांचा 24 अवतारांमधील 12 वे अवतार धन्वंतरीचे होते. त्यांना आयुर्वेदाचे जन्मदात्रे आणि देवांचे चिकित्सक मानले जाते. धनतेरसच्या दिवशी त्यांचा जन्म झाला होता. या दिवशी यमाची पूजा देखील केली जाते.
 
15 भाऊबीज याला यम द्वितीया देखील म्हणतात. यमाच्या निमित्ताने वसु बारस, धन तेरस, नरक चतुर्दशी, दिवाळी, गोवर्धनपूजा आणि भाऊबीज या दिवसांमध्ये दिवे लावावे. असे म्हणतात की यमराजाच्या निमित्ते जेथे दीपदान केले जाते, त्या जागी कधी ही अवकाळी मृत्यू होत नाही. या दिवशी यमाचे लेखनिक असलेले चित्रगुप्त यांची देखील उपासना केली जाते. या दिवशी श्रीकृष्णाने इंद्रोत्सवासाच्या ऐवजी गोवर्धन पूजेची सुरुवात केली.