बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. दीपावली
Written By
Last Modified: शनिवार, 26 ऑक्टोबर 2019 (07:34 IST)

Diwali पूजा दरम्यान या पैकी एक उपाय करेल मालामाल

दिवाळीला धन-धान्याची कामना केली जाते. या दिवशी काही उपाय केल्याने आर्थिक समस्यांपासून मुक्ती मिळू शकते.
 
आपल्या कमाईत वाढ व्हावी अशी इच्छा असणार्‍यांनी दिवाळीला अख्खी उडीद, दही आणि सिंदूर पिंपळाच्या मुळात ठेवून तेथे एक दिवा लावावा.
 
धनलाभासाठी दिवाळीला संध्याकाळी वडाच्या लत्तांना गाठ बांधावी आणि धन प्राप्ती नंतर ही गाठ सोडावी.
 
हत्थाजोडीला सिंदूर लावून धन ठेवत असलेल्या जागी ठेवल्याने आय वाढते आणि वायफळ खर्च कमी होतात.
 
उसाचे मूळ लाल वस्त्रात गुंडाळून त्याला सिंदूर आणि लाल चंदन लावावे आणि हे तिजोरीत ठेवावं.
 
देवी लक्ष्मीची पूजा करताना गोमती चक्र पूजेच्या ताटात ठेवून पूजा करावी. असे केल्याने धन वृद्धी होते.
 
दिवाळीच्या रात्री घुबडाचा फोटो तिजोरीवर लावावा. घुबड प्रत्येक पौर्णिमेला लक्ष्मी विराजत असलेल्या जागी चक्कर लावतो अशात देवी लक्ष्मीची आपल्यावर कृपा राहील.
 
देवी लक्ष्मीला दिवाळीच्या दिवशी काळी हळद अर्पित करावी आणि पूजा केल्यानंतर हळद लाल कपड्यात गुंडाळून धन ठेवत असलेल्या ठिकाणी ठेवावी.
 
पिंपळाच्या पानावर दिवा लावून पाण्यात प्रवाहित केल्याने आर्थिक समस्यांपासून मुक्ती मिळते.
 
तुळशीच्या रोपावर लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र अर्पित करावे. मुळात एक तुपाचा दिवा लावावा.
 
दिवाळी पूजन केल्यानंतर काळे तीळ हातात घेऊन घरातील सर्व सदस्यांच्या डोक्यावरून सात वेळा ओवाळून फेकून द्यावे.