रविवार, 5 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. दीपावली
Written By
Last Modified: शुक्रवार, 27 ऑक्टोबर 2023 (13:26 IST)

Diwali 2023 कधी आहे धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन, पाडवा आणि भाऊबीज

Diwali will be celebrated on 12th November हिंदू धर्मात दिवाळी हा आनंदाचा सण मानला जातो. हा दिव्यांचा उत्सव वसुबारस पासून सुरू होऊन भाऊबीजच्या दिवसापर्यंत पाच दिवस चालतो. सर्वप्रथम वसुबारस या दिवशी गाय-वासरांची पूजा नंतर धनत्रयोदशीच्या दिवशी धन्वंतरी देव, कुबेर देवता आणि माता लक्ष्मीची पूजा केली जाते. यानंतर नरक चतुर्दशीचा सण साजरा केला जातो ज्यादिवशी सकाळी अभ्यंग स्नान करण्याचे महत्त्व आहे. तर लक्ष्मीपूजनाच्या दिवशी संध्याकाळी देवीची पूजा केली जाते. दुसऱ्या दिवशी सकाळी दिवाळी पाडवा म्हणून साजरा केला जातो. यानंतर शेवटच्या दिवशी भाऊबीज हा सण साजरा होता. मात्र यावेळी सर्वं तिथींबद्दल संभ्रम आहे. अशात या वर्षी धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, दिवाळी, पाडवा आणि भाऊबीज कधी आहे हे जाणून घेऊया...
 
वसुबारस 2023 कधी आहे ? Vasubaras 2023 Date
यावर्षी वसुबारस 9 नोव्हेंबर 2023 रोजी आहे.
 
धनत्रयोदशी 2023 कधी आहे ? Dhanteras 2023 Date
यावर्षी धनत्रयोदशी 10 नोव्हेंबर 2023 रोजी आहे.
 
नरक चतुर्दशी 2023 कधी आहे ? Narak Chaturdashi 2023 Date
चतुर्दशी तिथीची सुरुवात 11 नोव्हेंबर 2023 रोजी दुपारी 01 वाजून 57 मिनिटांपासून होत आहे. तिथी समाप्ती 12 नोव्हेंबर 2023 रोजी दुपारी 02 वाजून 44 मिनिटाला होईल. नरक चतुदर्शीला अभ्यंग स्नानाचे महत्त्व आहे अशात पहाटे स्नान करण्याची परंपरा आहे. अशात उदया तिथी बघता नरक चतुर्दशी 12 नोव्हेंबर रोजी साजरी केली जाईल.
 
लक्ष्मी पूजन 2023 कधी आहे ? Lakshmi Pujan 2023 Date
अमावस्या तिथी 12 नोव्हेंबर 2023 रोजी दुपारी 02 वाजून 44 मिनिटापासून सुरु होईल आणि 13 नोव्हेंबर रोजी दुपारी 02 वाजून 56 मिनिटाला संपेल. दिवाळीत लक्ष्मी पूजनासाठी प्रदोष काल योग्य मानले जात असल्याने हा सण 12 नोव्हेंबर रोजी साजरा केला जाईल.
 
दिवाळीच्या दिवशी गणेश-लक्ष्मी पूजन मुहूर्त 2023 Diwali 2023 Shubh Muhurat
दिवाळीच्या दिवशी लक्ष्मी पूजन शुभ मुहूर्त 12 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 05 वाजून 31 मिनिटापासून ते रात्री 07 वाजून 36 मिनिटापर्यंत आहे. लक्ष्मी पूजनासाठी महानिशीथ काल मुहूर्त रात्री 11 वाजून 39 मिनिटापासून ते मध्य रात्री 12 वाजून 31 मिनिटापर्यंत राहील. शुभ मुहूर्तावर गणेश-लक्ष्मीची पूजा केल्याने घरात सुख-समृद्धी येते असे मानले जाते.
 
13 नोव्हेंबर रोजी अमावस्या अर्थात् सोमवती अमावस्या असेल जी देव पितृ कार्यासाठी अती उत्तम आहे आणि या दिवशी तीर्थ स्नान करावे.
 
दीपावली पाडवा 2023 कधी आहे ? Diwali Padwa 2023 Date
साधरणपणे दिवाळीच्या दुसर्‍या दिवशी पाडवा किंवा गोवर्धन पूजन हा सण साजरा केला जातो. गोवर्धन पूजा कार्तिक महिन्याच्या प्रतिपदा तिथीला होते. यंदा उदयातिथी प्रमाणे गोवर्धन पूजा 14 नोव्हेंबर 2023 रोजी आहे.
 
भाऊबीज 2023 कधी आहे ? Bhai Dooj 2023 Date
भाऊबीज अर्थात् यम द्वितीया हा सण बुधवारी 15 नोव्हेंबर 2023 रोजी साजरा केला जाईल.