शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. दीपावली
Written By
Last Modified: शुक्रवार, 13 नोव्हेंबर 2020 (14:38 IST)

रूप चतुर्दशीचे हे 5 उपाय केल्याने आपले अवघे आयुष्यच बदलून जाणार

दिवाळी हा 5 दिवसांचा महत्त्वाचा सण आहे. दिवाळीचा दुसरा दिवस आहे रूप चतुर्दशी, ज्याला रूप चौदस किंवा नरक चतुर्दशी असे ही म्हणतात. असे मानतात की या दिवशी सूर्योदयाच्या पूर्वी लवकर उठून उटण्याने स्नान करून वर्षभर सौंदर्यात वाढ होते. तसेच या दिवशी विधियुक्त पूजा केल्याने माणसांचे सर्व पाप नाहीसे होऊन ते स्वर्ग प्राप्त करतात. 
 
काही विशेष उपाय करून या दिवशी मिळणाऱ्या फळांच्या शुभतेत वाढ करू शकतात. चला तर मग हे उपाय कोणते आहेत ते जाणून घेऊ या.
 
1 ब्रह्म मुहूर्तात किंवा सूर्योदयाच्या पूर्वी उठावे आणि नित्यक्रमाने निवृत्त होऊन हळद, चंदन, हरभऱ्याच्या डाळीचे पीठ, मध, केसर आणि दुधाचे उटणे तयार करून त्याने अंघोळ करून पूजा करावी, या मुळे सकारात्मकता वाढते आणि शुभ परिणामाची प्राप्ती होते.
 
2 आजच्या दिवशी सकाळी तेल लावून आघाड्याची पाने पाण्यात टाकून त्या पाण्याने अंघोळ केल्याने नरकापासून मुक्ती मिळते.
 
3 फक्त उटणे लावूनच अंघोळ करू नये तर अत्तर लावावे आणि चांगल्या प्रकारे तयार व्हावे. या दिवशी सौंदर्याकडे विशेष लक्ष द्यावे. जेणे करून वर्षभर आपले सौंदर्य तसेच राहणार.
 
4 चतुर्दशीच्या रात्री तेल किंवा तिळाच्या तेलाचे 14 दिवे लावावे, या मुळे सर्व पापांपासून मुक्तता होते.
 
5 चतुर्दशीच्या दिवशी नवीन पिवळे रंगाचे कापडं घालून यमाची पूजा करावी. या मुळे अवकाळी मृत्यू होण्याची आणि नरकात जाण्याची भीती राहत नाही.