सोमवार, 28 नोव्हेंबर 2022
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. दीपावली
Written By

Instant Chakli बनवा, भाजणी नसेल तर बनवा तांदुळाच्या पिठाची खुसखुशीत चकली

सण आला की फराळाचे पदार्थ बनणारच. गोड-धोड, तिखट अशा पदार्थांनी आपले ताट भरलेले असणारच. शंकरपाळी, लाडू, अनारसे, चिवडा, चकली, शेव, करंज्या हे सारे पदार्थ तर असतातच. पण या दिवाळीत आपण तांदळाची चकली नक्की करून बघा. खाण्यात हलकी अशी असणारी ही तांदळाची चकली चवीला देखील छान असते. चला तर मग जाणून घेऊ या रेसिपी.

साहित्य -
2 कप तांदळाचे पीठ, 1 कप हरभराडाळीचे पीठ, 1/2 कप लोणी किंवा बटर, 1 छोटा चमचा तिखट, ओवा, तीळ, मीठ चवीनुसार.
 
कृती -
सर्वप्रथम एका भांड्यात तांदळाचे पीठ आणि हरभराडाळीचे पीठ एकत्र करा. बटर वितळवून या पिठात घाला. इतर सर्व जिन्नस देखील यात मिसळावे. एका भांडयात पाणी गरम करायला ठेवावं. आता हे पाणी लागत-लागत या पिठात मिसळा आणि हे पीठ चांगले मळून घ्या. आता गॅस वर कढईत तेल तापविण्यासाठी ठेवा. 
 
सोऱ्याला आतून तेल लावून यात मळलेल्या कणकेचा गोळा घाला. आता एका प्लास्टिकच्या कागदावर 5 ते 6 चकल्या पाडून घ्या आणि या चकल्या अलगद तेलात सोडा. मध्यम आचेवर चकल्या तळून घ्या.