बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. दिवाळी 2024
Written By
Last Updated : गुरूवार, 24 ऑक्टोबर 2024 (17:22 IST)

दिवाळीत देवी लक्ष्मीसोबत गणेशाची पूजा का केली जाते?

दरवर्षी आश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्या तिथीला दिवाळी हा सण साजरा केला जातो. दिवाळीच्या दिवशी सर्व लक्ष्मी देवीसह श्री गणेशाची पूजा देखील करतात. परंतु आपल्या हे माहित आहे का की लक्ष्मीसह गणपतीची पूजा केली जाते.
 
या कारणामुळे गणेश आणि देवी लक्ष्मीची पूजा केली जाते
देवी लक्ष्मीसह गणपतीची पूजा केल्याचे महत्त्व आहे. देवी लक्ष्मी श्री, अर्थात धन-संपत्तीची स्वामिनी आहे तर श्रीगणेश बुद्धी-विवेकचे स्वामी आहेत. बुद्धीविना धन-संपत्ती प्राप्ती होणे कठिण आाहे. लक्ष्मी देवीच्या कृपेने मनुष्याला धन-सुख-समृद्धीची प्राप्ती होते. देवी लक्ष्मीची उत्पत्ती पाण्यातून झाली आहे आणि पाणी नेहमी गतिमान असतं, त्याचप्रमाणे लक्ष्मीसुद्धा एका ठिकाणी थांबत नाही. लक्ष्मी सांभाळण्यासाठी बुद्धीची गरज असते. अशात दिवाळी पूजनात लक्ष्मीसह गणपतीची पूजा केली जाते. ज्याने लक्ष्मीसोबतच आपल्याला बुद्धीही मिळते. असे म्हणतात की जेव्हा लक्ष्मी येते तेव्हा तिच्या चमकदार प्रकाशात माणूस विवेक गमावतो आणि तसे घडू नये म्हणून लक्ष्मीजींसोबतच गणेशजींचीही पूजा करावी.
 
देवी लक्ष्मी आणि भगवान गणेशाची पौराणिक कथा
18 महापुराणांपैकी एक महापुराणात वर्णित कथाप्रमाणे, मंगल करणारे श्रीगणेश हे देवी लक्ष्मीचे दत्तक पुत्र आहे. एकदा देवी लक्ष्मीला स्वतःचा अभिमान वाटू लागला होता. ही गोष्ट भगवान विष्णूंच्या लक्षात आली तेव्हा त्यांनी देवीला म्हटले की जरी सर्व जग तुझी उपासना करत असेल आणि तुझ्या प्राप्तीसाठी सदैव उत्सुक असेल, तरीही तू अपूर्ण आहेस. तेव्हा देवी लक्ष्मीने याचे कारण विचारले तर प्रभू विष्णू म्हणाले की एखादी स्त्री आई होईपर्यंत स्त्रीला पूर्णत्व मिळू शकत नाही. हे जाणून घेतल्यानंतर लक्ष्मी देवीला खूप दु:ख झाले. त्यांनी आपली व्यथा देवी पार्वतीला सांगितली. तेव्हा देवी लक्ष्मीला पुत्र नसल्यामुळे दुःखी पाहून पार्वतीने आपला मुलगा गणेशाला देवीच्या मांडीवर बसवले. तेव्हापासून गणेश हे देवी लक्ष्मीचे दत्तक पुत्र म्हणून ओळखले जाऊ लागले. श्री गणेशाला दत्तक पुत्र रुपात प्राप्त करुन माता लक्ष्मीला खूप आनंद झाला. माता लक्ष्मीने गणेशाला वरदान दिले की जो कोणी माझ्यासोबत तुझी पूजा करणार नाही, लक्ष्मी त्याच्याजवळ कधीच राहणार नाही. त्यामुळे दिवाळीच्या पूजेमध्ये माता लक्ष्मीसह गणेशाची दत्तक पुत्र म्हणून पूजा केली जाते.