बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. दसरा
Written By
Last Modified: गुरूवार, 29 सप्टेंबर 2022 (13:35 IST)

अपराजिता पूजन : दसर्‍याला या प्रकारे करा पूजा

घरात ईशान्य दिशेला पवित्र आणि शुभ स्थान निवडा. हे ठिकाण मंदिर किंवा इतर देखील असू शकतं. 
घरातील सर्व सदस्य पूजेत सहभागी झाले तर उत्तम ठरेल.
निवडलेली जागा स्वच्छ करुन चंदनाने अष्टदल चक्र (आठ कमळाच्या पाकळ्या) बनवावे.
संकल्प घ्यावा की आपण आपल्या आणि कुटुंबाच्या सुख-समृद्धीसाठी अपराजिताची पूजा करत आहात.
नंतर अष्टदल चक्राच्या मध्यभागी अपराजिताय नमः या मंत्राने अपराजिता देवीचे आवाहन करा.
आता जया देवीचे उजव्या बाजूला क्रियाशक्तीय नमः या मंत्राने जप करत आवाहन करा.
उमायै नमः मंत्राचा जप करत विजया देवीचे डाव्या बाजूला आवाहन करा.
यानंतर अपराजिताय नमः, जयाय नमः आणि विजयायै नमः या मंत्रांचा जप करत षोडशोपचार पूजा करा.
देवीला पूजा स्वीकार करण्यास प्रार्थना करा.
पूजा संपल्यानंतर नमस्कार करावा. चुकल्याची क्षमा मागावी.
हारेण तु विचित्रेण भास्वत्कनकमेखला। अपराजिता भद्ररता करोतु विजयं मम। मंत्राने पूजेचे विसर्जन करावे.
 
Edited by: Rupali Barve