…अखेर ‘स्पर्श’ संस्थेकडील व्यवस्थापन प्रशासनाने काढले!

pimpari chinchwad mahapalika
Last Modified सोमवार, 10 मे 2021 (07:49 IST)
पिंपरी ऑटो क्लस्टर कोविड केअर सेंटरमध्ये मोफत उपचार असताना रुग्णाकडून पैसे घेतल्या प्रकरणी अखेर ‘स्पर्श’ संस्थेचे व्यवस्थान अखेर महापालिका प्रशासनाने काढून घेतले. सोमवाररी दि. 10 मेपासून ऑटो क्लस्टर कोविड सेंटर महानगरपालिका चालवणार आहे, असे आदेश महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी दिले आहेत.

‘स्पर्श’ च्या मनमानी विरोधात भाजपा नगरसेवक कुंदन गायकवाड, विकास डोळस यांनी प्रथम आवाज उठवला. महापालिका आयुक्त राजेश पाटील व पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी तातडीने कारवाई केली, त्यामुळे पिंपरी-चिंचवडकरांमधून समाधान व्यक्त होत आहे.

ऑटो क्‍लस्टर येथील कोविड सेंटर चालविणाऱ्या स्पर्श संस्थेत बेडसाठी लाख रुपये लाटणाऱ्या तसेच रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार कऱणाऱ्या स्पर्श हेल्थकेअर संस्थेला महापालिकेने मोठा दणका दिला. पोलिसा आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी भ्रष्ट्र, अनागोंदी कारभार करणाऱ्या स्पर्श संस्थेवर तात्काळ कठोर कारवाई करा, अन्यथा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, असा गर्भीत इशारा स्पर्श कडून सर्व काम काढून घेण्यात आले आणि त्यांचा ठेका रद्द करण्याची कारवाई करण्यात आली. महापालिकेने स्पर्श व्यवस्थापन समाधानकारक काम करु शकलेले नाही, कामात हेळसांड केली असा ठपका ठेवला आणि ताबडतोब काम काढून घेतले. दरम्यान, महापालिका आयुक्त राजेश पाटील यांच्यावरच स्पर्शला पाठिशी घातल असल्याचा थेट आरोप सुरू झाल्याने त्यांच्या गळ्यापर्यंत आल्याने त्यांनी अखेर स्पर्शचा कार्यक्रम केला. स्पर्श च्या कर्मचाऱ्यांचा रेमडेसिवीर इंजेक्शन काळाबाजारात सहभाग हे गुन्हेगारी कृत्यात सहभाग असल्याचे स्पष्ट दर्शविते, ते मानवतेला काळीमा फासणारे आणि व्यवस्थापनाचे कुठलेही नियंत्रण नसल्याचे स्पष्ट करते, असाही ठपका महापालिकेने ठेवला आहे.
स्पर्श च्या डॉक्टरांनी चार रुग्णांकडून बेडसाठी पैसे घेतल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले. याप्रकरणातील अटक केलेल्या चार डॉक्‍टरांकडून तीन लाख 70 हजारांची रोकड हस्तगत करण्यात आली. स्पर्श या संस्थेने गैरव्यवहार तसेच भ्रष्टाचार केल्याचे दिसून आल्याने या संस्थेच्या विरोधात कायदेशीर कारवाई करावी, अन्यथा कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्‍न निर्माण होईल, असा इशारा पोलीस आयुक्‍त कृष्ण प्रकाश यांनी महापालिका आयुक्‍तांना पाठविलेल्या पत्रात दिला होता. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या ऑटो क्‍लस्टर येथील रुग्णालयात रुग्णाला दाखल करण्यासाठी स्पर्श हॉस्पिटलच्या डॉक्‍टरांनी एक लाख रुपये घेतल्याचा प्रकार समोर आला होता. यानंतर महापालिका सभेत सर्वपक्षीय नगरसेवकांनी स्पर्शवर कारवाईची मागणी केली होती. आयुक्तांनी आश्‍वासन दिल्यानंतरही अद्यापपर्यंत कारवाई केलेली नव्हती.

पैसे स्विकारल्याप्रकरणी डॉ. प्रवीण जाधव, डॉ. शशांक राळे, डॉ. सचिन कसबे या तिघांसह एका महिला डॉक्‍टरला अटक करण्यात आली. या चौघांकडून 3 लाख 70 हजार रुपये जप्त करण्यात आली असून हे चारही आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. यानंतर ऑटो क्‍लस्टर येथील एका कर्मचाऱ्याला दोन मध्यस्थांमार्फत दोन रेमडेसीवीर काळ्या बाजारात 80 हजारांना विकताना रंगेहाथ पकडण्यात आले. राष्ट्रवादीचे जेष्ठ नगरसेवक योगेश बहल यांच्यासह सर्व पक्षांच्या नगरसेवकांनी स्पर्शच्या विविध प्रकारच्या गंभीर तक्रारी केल्या होत्या.


यावर अधिक वाचा :

महाराष्ट्र बेरोजगरी भत्ता मिळवण्यासाठी अर्ज कसा करावा ...

महाराष्ट्र बेरोजगरी भत्ता मिळवण्यासाठी अर्ज कसा करावा Maharashtra Berojgari Bhatta
महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजनेच्या माध्यमातून राज्यातील सर्व बेरोजगार सुशिक्षित ...

वीज पुरवठा खंडित झाल्याने व्हेंटिरेटरवरील रुग्णाचा मृत्यू?

वीज पुरवठा खंडित झाल्याने व्हेंटिरेटरवरील रुग्णाचा मृत्यू?
करविर तालुक्यातील उचगाव येथील ओेमेश काळे यांना घरातच व्हेंटिलेटर लावले होते. पण वीज ...

राज्यसभा निवडणूक 2022 : भाजपानं महाराष्ट्रात केडरपेक्षा ...

राज्यसभा निवडणूक 2022 : भाजपानं महाराष्ट्रात केडरपेक्षा बाहेरुन आलेल्यांना संधी का दिली?
परप्रांतीय उमेदवाराला महाराष्ट्रातली राज्यसभेची जागा दिली म्हणून कॉंग्रेस पक्षांतर्गत आणि ...

लॉर्ड्स स्टेडिअममध्ये मॅच थांबवली, लॉर्ड्सच्या कॉमेंट्री ...

लॉर्ड्स स्टेडिअममध्ये मॅच थांबवली, लॉर्ड्सच्या कॉमेंट्री बॉक्सला शेन वॉर्न या नावाने ओळखले जाईल
क्रिकेटचा मक्का म्हटल्या जाणाऱ्या लॉर्ड्सच्या मैदानावर इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील ...

मुंबईत आजपासून दुचाकीवर मागे बसणाऱ्यालाही हेल्मेटसक्ती ...

मुंबईत आजपासून  दुचाकीवर मागे बसणाऱ्यालाही हेल्मेटसक्ती झाली सुरु; नियम तोडला तर इतका दंड
मुंबई पोलिसांनी हेल्मेट वापरासंबंधी नवी नियमावली जारी केली असून आता केवळ दुचाकीचालकच ...

1 जुलैला देवेंद्र फडणवीस घेऊ शकतात मुख्यमंत्रिपदाची शपथ, ...

1 जुलैला देवेंद्र फडणवीस घेऊ शकतात मुख्यमंत्रिपदाची शपथ, शिंदे गटाकडे लक्ष
उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यामुळे महाराष्ट्रात नवीन सरकार स्थापनेचा मार्ग जवळपास मोकळा झाला ...

उद्धव ठाकरे यांचा मुख्यमंत्रिपदाचा आणि आमदारकीचा राजीनामा

उद्धव ठाकरे यांचा मुख्यमंत्रिपदाचा आणि आमदारकीचा राजीनामा
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला आहे. काही क्षणांपूर्वीच त्यांनी ...

पुणे-संगमनेर-नाशिक सेमी हायस्पीड प्रकल्पासाठी हालचालींना ...

पुणे-संगमनेर-नाशिक सेमी हायस्पीड प्रकल्पासाठी हालचालींना वेग ; केंद्रीय मंत्री मंडळ घेणार मोठा निर्णय
रेल्वे मंत्रालयाने मागच्या काही दिवसांपूर्वी पुणे-संगमनेर- नाशिक मार्गावर वेगवान ...

एकनाथ शिंदे बंड :उद्या 11 वाजताच होणार बहुमताची चाचणी, ...

एकनाथ शिंदे बंड :उद्या 11 वाजताच होणार बहुमताची चाचणी, सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय
सुप्रीम कोर्टाने उद्या बहुमत चाचणी घेण्याचा निर्णय दिला आहे. न्या. सूर्यकांत कौल आणि ...

विजेचा धक्कासख्ख्या भावांचा मृत्यू

विजेचा धक्कासख्ख्या भावांचा मृत्यू
शेडला अडकवलेली दुधाची बादली घेताना विजेचा धक्का बसून सख्ख्या भावांचा मृत्यू झाला आहे. ...