बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: बुधवार, 28 एप्रिल 2021 (20:57 IST)

कोरोना व्यवस्थापन कार्यात सैन्यदलातील निवृत्त वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सेवा घेण्याची सूचना

मुंबई : सैन्यदलातून सेवानिवृत्त झालेल्या राज्यातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सेवा कोरोना व्यवस्थापन कार्यात घेण्यात याव्या, अशी सूचना राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केली.
 
शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या प्रधान सचिव सीमा व्यास व सैनिक कल्याण मंडळाचे अधिकारी यांचेशी राज्यपालांनी मंगळवारी (दि. २७) दूरस्थ माध्यमातून चर्चा केली, त्यावेळी त्यांनी उपरोक्त सूचना केली.
 
सैन्यदलातील अधिकाऱ्यांना समाजात सन्मान व प्रतिष्ठा आहे. त्यामुळे सैन्यदलातून निवृत्त झालेल्या वैद्यकीय तसेच बिगर वैद्यकीय अधिकारी व जवानांची देखील कोरोना विषयक कार्यात मदत घेतल्यास त्याचा राज्याला लाभच होईल असे राज्यपालांनी सांगितले.