Dharma Sangrah
✕

Potato Sabudana Chilla एकादशी व्रत स्पेशल रेसिपी साबुदाण्याचे धिरडे

Updated: शुक्रवार, 20 जून 2025 (16:56 IST)
साबुदाणा मऊ आणि चिकट नसावा यासाठी भिजवताना पाण्याचे प्रमाण योग्य ठेवा (साबुदाण्याच्या पृष्ठभागापर्यंत पाणी).
मिक्सरमध्ये भिजवलेला साबुदाणा ब्लेंड करुन पेस्ट तयार करुन घ्या. आता त्या उकडलेला बटाटा कुस्करुन, दाण्याचे कूट, बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, जिरे, सेंधव मीठ आणि कोथिंबीर (ऐच्छिक) मिक्स करा.
मिश्रणात आवश्यकतेप्रमाणे थोडे पाणी घालून पीठ तयार करा. खूप पातळ होणार नाही याची काळजी घ्या.
लिंबाचा रस घालून मिश्रण नीट एकजीव करा.
नॉन-स्टिक तव्यावर थोडे तेल किंवा तूप लावा आणि मध्यम आचेवर गरम करा.
तयार केलेल्या मिश्रणाचा एक मोठा चमचा तव्यावर पसरवा. हलक्या हाताने गोलाकार धिरड्याचा आकार द्या.
दोन्ही बाजूंनी सोनेरी रंग येईपर्यंत मंद आचेवर शिजवा. प्रत्येक बाजूसाठी २-३ मिनिटे लागू शकतात.
धिरडे कुरकुरीत होण्यासाठी तेल किंवा तूप थोडे जास्त वापरू शकता.
गरमागरम धिरडे उपवासाच्या दही-दाण्याच्या चटणीसोबत किंवा साध्या दह्यासोबत सर्व्ह करा.
तुम्ही शेंगदाण्याची चटणी किंवा उपवासाचे नारळ-कोथिंबीर चटणीही बनवू शकता.
ALSO READ: Fasting Recipe कुरकुरीत बटाटा चिवडा
टिपा: साबुदाणा जास्त भिजवू नये, अन्यथा धिरडे चिकट होऊ शकतात.
दाण्याचे कूट धिरड्याला कुरकुरीतपणा आणते, त्यामुळे ते घालायला विसरू नका.
उपवासात हिरव्या मिरच्या टाळत असाल तर त्याऐवजी जिरे किंवा मिरे पावडर वापरू शकता.
धिरड्याला वेगळा स्वाद हवा असल्यास, थोडे ताजे खोबरे घालू शकता.
ALSO READ: Fasting Recipe मखाना बदाम खीर
हा पदार्थ उपवासात ऊर्जा देणारा आणि पचायला हलका आहे.

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

हिवाळ्यात वजन झपाट्याने वाढत आहे का? शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी दररोज ही योगासने करा

नैतिक कथा : अति लोभ...माश्या आणि मधाची गोष्ट

तुळशीच्या झाडावरील कीड घालवण्यासाठी सोपे घरगुती उपाय

हिवाळ्याच्या संध्याकाळी ५ पौष्टिक भाज्यांचे सूप बनवा, चवीसोबतच आरोग्याचीही काळजी घ्या

वजन कमी करण्याचा सर्वात सोपा मंत्र; प्रत्येक जेवणानंतर केवळ १० मिनिटे पायी चाला

पुढील लेख
Show comments