Dharma Sangrah
✕

संकष्टी चतुर्थी विशेष उपवासात बनवा शरीराला थंडावा देणाऱ्या थंडगार रेसिपीज

Updated: शनिवार, 4 एप्रिल 2026 (10:56 IST)
साहित्य: २ उकडलेली रताळी, अर्धा लिटर दूध, साखर (किंवा गूळ), वेलची पूड आणि ड्राय फ्रूट्स.

कृती-
1. दूध आटवून थोडे घट्ट करून घ्या.
2. उकडलेली रताळी सोलून किसून घ्या किंवा स्मॅश करा.
3. दुधात रताळ्याचा किस आणि साखर घालून ५-७ मिनिटे शिजू द्या.
4. वरून वेलची पूड टाका आणि ही खीर २ तास फ्रिजमध्ये ठेवून थंड सर्व्ह करा.

राजगिरा फ्रूट कस्टर्ड

उपवासाला फळं खाणं नेहमीच चांगलं असतं. त्याला थोडा 'ट्विस्ट' देऊन तुम्ही कस्टर्ड बनवू शकता.

साहित्य: दुधात भिजवलेला राजगिरा (किंवा राजगिरा लाही), दूध, साखर, सफरचंद, केळी, डाळिंबाचे दाणे.

कृती-
1. दूध साखर घालून थोडे घट्ट गरम करा.
2. त्यात राजगिरा लाही किंवा शिजवलेला राजगिरा घालून मिक्स करा.
3. मिश्रण थंड झाल्यावर त्यात आवडीची फळे चिरून टाका.
4. थंडगार झाल्यावर फराळ म्हणून याचा आस्वाद घ्या.

दह्यातील साबुदाणा

जर तुम्हाला खिचडीचा त्रास होत असेल (एसिडिटी), तर दही-साबुदाणा हा उत्तम पर्याय आहे.

साहित्य: भिजवलेला साबुदाणा, ताजे दही, बारीक चिरलेली हिरवी मिरची, भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट आणि चवीनुसार मीठ (किंवा सैंधव मीठ).

कृती-
1. भिजवलेल्या साबुदाण्यात ताजे दही मिक्स करा.
2. त्यात दाण्याचा कूट, मिरची आणि मीठ घालून एकजीव करा.
3. वरून तुपाची आणि जिऱ्याची फोडणी दिली तर चव अधिकच वाढते.

काही टीप्स-
शहाळ्याचे पाणी: उपवासाच्या दिवशी डिहायड्रेशन टाळण्यासाठी शहाळ्याचे पाणी आवर्जून प्या.
वरीचे ताक: भगर खाताना सोबतीला जिरे टाकलेले थंड ताक घेतल्यास पोट शांत राहते.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीचीपूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
ALSO READ: अतिशय शाही आणि चविष्ट पदार्थ मावा साबुदाणा खीर रेसिपी
Edited By- Dhanashri Naik
ALSO READ: उपवासाचे स्वादिष्ट साबुदाणा धिरडे; रेसिपी लिहून घ्या

सर्व पहा

फुफ्फुसे मजबूत करण्यासाठी दररोज फक्त १० मिनिटे प्राणायाम करा, फायदे जाणून घ्या

कमी वेळात काढा सोपी अन् सुंदर रांगोळी! ५ मिनिटांत बनणाऱ्या ४ बेहतरीन डिझाइन्स

टिकू तलसानिया आणि पूजा जोशी यांच्या 'देवी विज्ञानम' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

धूर्तपणाचे वाईट परिणाम होतात; पिंजऱ्यातील सिंह...हितोपदेशातील गोष्ट

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घराच्या मुख्य दारावर 'या' ५ गोष्टी नक्की लावा

सर्व पहा

Lakshmi Pujan 2026 Wishes in Marathi लक्ष्मी पूजन शुभेच्छा संदेश

Healthy Baked Mathri दिवाळीत सध्या ट्रेंडमध्ये असलेली एअर फ्रायर मेथी-मसाला मठरी

चहा प्यायल्याने पोटात गॅस आणि ॲसिडिटी होते का? चहा पिताना या ५ गोष्टी टाळा!

सर्टिफिकेट कोर्स इन साइबर सिक्योरिटी मध्ये करिअर बनवा, पात्रता, व्याप्ती ,पगार जाणून घ्या

अभ्यंग स्नानाचे आरोग्यदायी फायदे शास्त्र आणि विज्ञान दोन्ही सांगतात, जाणून घ्या

पुढील लेख
Show comments