Marathi Biodata Maker

श्रावणात पचनास हलक्या, पौष्टिक आणि झटपट होणाऱ्या ३ खास 'हेल्दी' उपवासाच्या रेसिपी

Updated: सोमवार, 3 ऑगस्ट 2026 (15:52 IST)
कृती-
सर्वात आधी एका भांड्यात भगरीचे पीठ, किसलेला बटाटा, दाण्याचा कूट, मिरची-जिरे पेस्ट, राजगिरा पीठ आणि मीठ एकत्र करा. थोडे थोडे पाणी घालून घट्ट गोळा मळून घ्या (१० मिनिटे झाकून ठेवा). बटर पेपरवर किंवा सुती कपड्यावर थोडे तूप लावून पिठाचा छोटा गोळा थापून घ्या. तव्यावर तूप सोडून दोन्ही बाजूंनी छान खरपूस भाजून घ्या. गरमागरम थालीपीठ उपवासाच्या दह्यासोबत सर्व्ह करा!

2. राजगिरा आणि मखान्याची खीर (Makhana & Rajgira Kheer)
मखाना आणि राजगिरा हे दोन्ही कॅल्शियम आणि प्रोटीनने भरपूर असतात. ही खीर चविष्ट आणि तितकीच एनर्जी देणारी आहे.

साहित्य-
मखाने: १ कप
राजगिरा (लाह्या किंवा पीठ): ½ कप
दूध: ½ लिटर (फुल क्रीम)
गुळ किंवा साखर: चवीनुसार
वेलची-जायफळ पूड: ½ छोटा चमचा
सुक्या मेव्याचे तुकडे: (काजू, बदाम, पिस्ता) २ चमचे
तूप: १ मोठा चमचा

कृती-
सर्वात आधी कढईत तूप गरम करून त्यात मखाने हलके तांबूस होईपर्यंत भाजून घ्या आणि थोडे क्रश (बारीक) करा. त्याच कढईत दूध उकळायला ठेवा. दूध थोडे घट्ट झाल्यावर त्यात भाजलेले मखाने आणि राजगिरा घाला. मंद आचेवर ५-७ मिनिटे उकळू द्या, जेणेकरून मखाने मऊ होतील. त्यात गुळ/साखर, सुका मेवा आणि वेलची पूड घालून आणखी २ मिनिटे शिजवा. पौष्टिक आणि गरमागरम किंवा थंडगार खीर खाण्यासाठी तयार!

3. रताळ्याची खमंग चाट (Sweet Potato Chaat)
रताळेफायबर आणि व्हिटॅमिन्सने समृद्ध असते. तळलेल्या पदार्थांना हा एक उत्तम आणि टेस्टी पर्याय आहे.

साहित्य-
रताळी: २ (उकडलेली किंवा वाफवलेली)
भाजलेले शेंगदाणे: २ मोठे चमचे
हिरवी मिरची बारीक चिरलेली: १
भाजलेले जिरे पूड: ½ छोटा चमचा
सैंधव मीठ व काळे मीठ: चवीनुसार
लिंबू रस: १ चमचा
कोथिंबीर: (उपवासाला चालत असल्यास) बारीक चिरलेली
अनाराचे दाणे: सजवण्यासाठी (पर्यायी)

कृती-
सर्वात आधी उकडलेली रताळी सोलून त्याचे मध्यम आकाराचे तुकडे करून घ्या. एका बाऊलमध्ये रताळ्याचे तुकडे, भाजलेले शेंगदाणे आणि हिरवी मिरची एकत्र करा. वरून जिरे पूड, सैंधव मीठ, काळे मीठ आणि लिंबाचा रस घाला. सर्व जिन्नस हलक्या हाताने मिक्स करा आणि वरून कोथिंबीर व डाळिंबाचे दाणे घालून सर्व्ह करा.
ALSO READ: श्रावण स्पेशल : साबुदाणा थालीपीठ, जाणून घ्या रेसिपी
हेल्दी टिप: उपवासाच्या दिवशी तळलेले पदार्थ टाळून भरपूर पाणी, नारळ पाणी, आणि ताक प्या, ज्यामुळे शरीरात ऊर्जा टिकून राहील!
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीचीपूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
ALSO READ: श्रावणात उपवासाला बनवा फराळी पॅटीस, लिहून घ्या रेसिपी
Edited By- Dhanashri Naik<>

सर्व पहा

Ganesh Chaturthi 2026 Sthapana Shubh Muhurat: १४ सप्टेंबर रोजी गणपती स्थापना शुभ मुहूर्त

देवांना अत्यंत प्रिय असणाऱ्या या फुलांच्या माळा अर्पण करा; मिळवा विशेष आशीर्वाद!

गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी ३ प्रकारच्या चॉकलेट मोदकांची रेसिपी

कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी रोजच्या आहारात हे पदार्थ खा; हाडे आणि दात राहतील मजबूत!

खाऊन योग करणे योग्य आहे की अयोग्य, जेवणानंतर योगा करण्याचे परिणाम जाणून घ्या

सर्व पहा

नैतिक कथा : गोष्ट चेटकीण आणि गुलाब फुलाची

गणपती बाप्पा आणि गौरीच्या प्रसादासाठी पौष्टिक ड्रायफ्रूट्स खजूर रोल पाककृती

सततचा खोकला हे फुफ्फुसाच्या कर्करोगाचे लक्षण आहे का? जाणून घ्या कर्करोगतज्ज्ञांचा महत्त्वाचा सल्ला

श्री गणेशाच्या नैवेद्यासाठी केशरी खव्याचे लाडू, गणपती उत्सवामध्ये नक्की ट्राय करा

या पानांचे पाणी आरोग्यासाठी फायदेशीर? उकळून पिण्यापूर्वी जाणून घ्या संभाव्य फायदे

पुढील लेख
Show comments