1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. श्रावण
Written By
Last Updated : बुधवार, 28 ऑगस्ट 2024 (09:01 IST)

श्रावण स्पेशल : साबुदाणा थालीपीठ, जाणून घ्या रेसिपी

Sago Thalipeeth Recipe
श्रावण सुरु होण्यासाठी थोडासाच अवधी राहिलेला आहे. अनेक जण श्रावणमध्ये व्रत ठेवतात. उपास करतात. तर आज आम्ही तुम्हाला उपवासाचा एका छान पदार्थ सांगणार आहोत. तो पदार्थ म्हणजे साबुदाणा थालीपीठ. हे थालीपीठ उपासाला तर चालतेच पण तुम्ही लहान मुलांना देखील लंच मध्ये देऊ शकतात. 
 
साहित्य-
1 कप साबुदाणा भिजवलेला 
1/2 कप उकडलेले बटाटे 
1/4 कप भाजलेल्या दाण्याचा कूट 
2 हिरव्या मिरच्या 
चवीनुसार सेंधव मीठ 
1/2 छोटा चमचा जिरे 
ताजी कोथिंबीर कापलेली 
तूप 
 
कृती-
एका मोठ्या ताटात किंवा बाऊलमध्ये भिजवलेला साबुदाणा घ्यावा. त्यामध्ये बटाटे, दाण्याचा कूट, हिरवी मिरचीचे तुकडे , सेंधव मीठ, जिरे आणि कोथिंबीर घालावी. हे मिश्रण चांगल्या प्रकारे मिक्स करून दहा मिनिटांसाठी भिजत ठेवावे.
 
यानंतर याचे गोळे बनवून एका प्लॅस्टिकच्या पिशवीवर तूप लावून थापून घ्यावे. म्हणजे ते चिटकणार नाही. तवा गरम करून त्याला तूप लावावे. व थापलेले थालीपीठ त्या तव्यावर टाकावे. तसेच खुसखुशीत होइपर्यंत शेकावे. व दोन्ही बाजूंनी तूप लावावे. आता हे थालीपीठ तुम्ही दही किंवा उपवासाची हिरवी चटणी यासोबत सर्व्ह करू शकतात. 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By- Dhanashri Naik