शुक्रवार, 29 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. उपवासाचे पदार्थ
Written By
Last Modified: मंगळवार, 8 ऑक्टोबर 2024 (10:52 IST)

Navratri Special Recipe: वरईचे ढोकळे

varai dhokla
एक वाटी वरई 
अर्धा कप दही 
एक चमचा आले मिरची पेस्ट 
चवीनुसार सेंधव मीठ 
अर्धा चमचा जिरे 
अर्धा चमचा इनो (आवश्यकअसल्यास )
एक चमचा तेल 
अर्धा कप पाणी 
 
कृती- 
सर्वात आधी वरई स्वच्छ धुवून पाण्यात भिजत घालावी. आता भिजवलेल्या वरईमध्ये पाणी मिक्स करून मिक्सरमधून बारीक करून घ्यावे. लक्षात राहता जास्त पाणी राहायला नको यामुळे मिश्रण पातळ होऊ शकते. 
 
आता या मिश्रणामध्ये दही, आले मिरची पेस्ट, सेंधव मीठ, घालून हे मिश्रण एकजीव करावे. व हे मिश्रण १५ मिनिट झाकून ठेवावे. 
 
आता प्लेट ला तेल लावून हे मिश्रण त्यामध्ये टाकावे. व ढोकळा वाफवतो त्याप्रमाणे वाफवून घेणे .
 
आता एक कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये जिरे आणि मिरचीचा तडका तयार करून घ्यावा. व वरई ढोकळ्यावर टाकावा. 
 
आता वरई ढोकळ्याचे  पीस करून नारळाची चटणी किंवा कोथिंबीर चटणी सोबत सर्व्ह करावे.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By- Dhanashri Naik