रविवार, 5 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. फादर्स डे
Written By
Last Modified: बुधवार, 15 जून 2022 (17:00 IST)

Father's Day Wishes फादर्स डे च्या शुभेच्छा

खिसा रिकामा असला तरीही कधी नाही म्हणाले नाही,
माझ्या बाबापेक्षा श्रीमंत मी कधी पाहिला नाही
पितृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा
 
बाबा म्हणजे अपरिमित कष्ट करणारे शरीर
बाबा म्हणजे अपरिमित काळजी करणारं मन
स्वतःच्या इच्छा आकांक्षा बाजूला ठेऊन
मुलांसाठी झटणारं अंतःकरण
फादर्स डे च्या खूप खूप शुभेच्छा
 
तुमचं नाव माझ्या नावापुढे जोडल्याचा अभिमान आहे,
कोणीही कधीही तुमची जागा नाही घेऊ शकणार,
माझ्या प्रत्येक कामात विचारात श्वासात तुम्हाला घेऊन आजही मी ठाम आहे
पितृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा
 
तुम्ही कितीही मोठे झाला तरीही
असा एकमेव माणूस ज्याच्याकडे तुम्ही
मोठा माणूस म्हणूनच पाहणार आणि तो म्हणजे बाबा
फादर्स डे च्या खूप खूप शुभेच्छा
 
आईसाठी खूप लिखाण केलं जातं
पण बाबांसाठी व्यक्त होणं खूपच कठीण
आजचा दिवस आहे खास म्हणूनच
तुम्हाला तुमचे महत्व सांगण्याचा घेतलाय ध्यास
फादर्स डे च्या खूप खूप शुभेच्छा
 
माझे पाय मी घट्ट रोवून उभा आहे
कारण माझ्यासाठी भक्कम असा वडिलांचा खांदा आहे
फादर्स डे च्या खूप खूप शुभेच्छा
 
बाबांसाठी काय स्टेटस ठेवावे
माझं जे काही स्टेटस आहे
ते त्यांच्यामुळेच आहे
फादर्स डे च्या खूप खूप शुभेच्छा
 
बाप असतो तेलवात
जळत असतो क्षणाक्षणाला
हाडांची काडे करून
आधार देतो मनामनाला
फादर्स डे च्या खूप खूप शुभेच्छा
 
आनंदाचा प्रत्येक क्षण माझा असतो
जेव्हा माझ्या बाबाचा हात माझ्या हाती असतो
फादर्स डे च्या खूप खूप शुभेच्छा
 
नेहमी मला पाठिंबा दिला
आणि दाखवला माझ्यावर विश्वास
खूप खूप धन्यवाद बाबा
आजचा दिवस आहे खूप खास
फादर्स डे च्या खूप खूप शुभेच्छा
 
इतर कोणाहीसाठी कशीही असले तरीही
माझ्या बाबांसाठी मात्र मी त्यांची परीच आहे
फादर्स डे च्या खूप खूप शुभेच्छा
 
पितृ देवो भव:
पितृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा