बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. विधानसभा निवडणूक 2022
  3. गोवा विधानसभा निवडणूक 2022
Written By
Last Updated : गुरूवार, 29 सप्टेंबर 2022 (00:19 IST)

Goa Elections 2022 मनोहर पर्रीकर यांच्या मुलाचे नाव बीजेपीच्या यादीत नाही, केजरीवाल म्हणाले- उत्पल पर्रीकर यांनी आपकडून निवडणूक लढवावी

utpal parrikar
गोवा विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने 34 उमेदवारांची नावे जाहीर केली मात्र गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर यांचे नाव या यादीत नसल्याचा फायदा आप घेऊ पाहत आहे. तसे तर त्यांच्याशी चर्चा सुरू असल्याचे भाजपचे म्हणणे आहे पण आम आदमी पक्षाने उत्पल पर्रीकर यांना त्यांच्या पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवण्यास निमंत्रण दिले आहे.
 
ट्विटमध्ये अरविंद केजरीवाल यांनी लिहिले की, "भाजपचे पर्रीकर कुटुंबासोबतही 'वापरा आणि फेका'चे धोरण असल्यामुळे गोव्यातील लोकांना खूप वाईट वाटत आहे." मनोहर पर्रीकरांचा मी नेहमीच आदर केला आहे. उत्पल पर्रीकर पक्षात सामील व्हा आणि आप च्या किटावर निवडणूक लढवा.
 
गोवा विधानसभेसाठी 14 फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. आणि गोवा निवडणुकीसाठी भाजपने 34 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे.