ganesh chaturthi

Guru Purnima 2024 Wishes : गुरू पौर्णिमेच्या शुभेच्छा

Updated: रविवार, 21 जुलै 2024 (10:04 IST)
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
 
* गुरु म्हणजे परीस आणि शिष्य म्हणजे लोखंड, 
लोखंडाचं सोनं करणाऱ्या गुरुंना, गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
 
* गुरुविण कोण दाखविल वाट 
आयुष्याचा पथ हा दुर्गम, अवघड डोंगर-घाट.
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
 
* गुरु तू जगाची माऊली, जणू सुखाची सावली
गुरू म्हणजे, तो कुंभार जो मातीचे मडके घडवतो.
गुरू पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा..!
 
* योग्य काय, अयोग्य काय ते आपण शिकवता
खोटे काय, खरे काय ते आपण समजावता
जेव्हा काहीच सुचत नाही अशा वेळी आमच्या अडचणी दूर करता
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!!
 
* आदी गुरूसी वंदावे |
मग साधनं साधावे ||
गुरु म्हणजे माय बापं |
नाम घेता हरतील पाप ||
गुरु म्हणजे आहे काशी |
साती तिर्थ आहे तया पाशी ||
तुका म्हणे ऐंसे गुरु |
चरण त्याचे हृदयीं धरू ||
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा !
 
* हजार चांदण्या शोधण्यापेक्षा
एकच चंद्र शोधा..
आणि हजार चंद्र शोधण्यापेक्षा
एकच सूर्य जवळ ठेवा…
गुरू पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा..!
 
* गुरु म्हणजे ज्ञानाचा उगम आणि अखंड वाहणारा झरा.. 
गुरु म्हणजे निष्ठा आणि कर्तव्य.. 
गुरु म्हणजे निस्सीम श्रद्धा आणि भक्ती.. 
गुरु म्हणजे विश्वास आणि वात्सल्य.. 
गुरु म्हणजे आदर्श आणि प्रमाणतेचे मूर्तिमंत प्रतिक.. 
आजपर्यंत कळत नकळतपणे ज्ञान देणाऱ्या सर्वांना, 
गुरुपौर्णिमेच्या दिवशी माझे वंदन…
गुरू पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा..!
 
* गुरू तुमच्या उपकाराची कसे फेडू मी मोल,
लाख किमती असेल धन पण गुरू माझा अनमोल.
गुरू पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
 
* गुरु विना ज्ञान नाही आणि ज्ञानाविना आत्मा नाही.
गुरू पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
 
* माझ्या सर्व गुरूंना 
गुरू पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
 
* ध्यान, ज्ञान, धैर्य आणि कर्म ह्या सर्वच गुरुच्या देणंग्या आहेत
गुरू पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
 
* गुरुर्ब्रम्हां गुरुर्विष्णु, गुरुदेवो महेश्वर…
 गुरु साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरवे नमः 
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
 
* गुरु आहे सावली
गुरु आहे ज्ञान
गुरु आहे आधार
गुरु आहे निसर्गात नसे त्याला आकार
गुरु आहे अंबरात
गुरु आहे सागरात
शिकावे ध्यान लावुनी 
गुरु आहे चराचरात
गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा
 
* गुरु हा मेणबत्तीसारखा असतो
जो इतरांचा मार्ग प्रकाशण्यासाठी स्वत: जळत राहतो
गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा
 
* ज्याने गुरुमंत्र आत्मसात केला
तो भवसागर ही करेल पार
गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा
 
 
Edited by - Priya Dixit 
 
 

सर्व पहा

Rishi Panchami 2026: १५ सप्टेंबर रोजी ऋषी पंचमी, शुभ मुहूर्त, पूजा विधी आणि व्रतकथा

Shree Gajanan Maharaj Punyatithi 2026 Vinmra Abhivadan संत गजानन महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त कोटी कोटी नमन

संत गजानन महाराज निर्वाण दिन: "गण गण गणांत बोते"च्या जयघोषात विसावलेला साक्षात्कार

गौरी पूजनात ऐनवेळी मासिक पाळी आली तर काय करावे? जाणून घ्या धार्मिक नियम, पर्याय आणि आरोग्य!

ऋषी पंचमी विशेष: पारंपरिक आणि पौष्टिक ऋषींची भाजी Rishi Panchami Naivedyam

सर्व पहा

Ganesh Chaturthi 2026 Sthapana Shubh Muhurat: १४ सप्टेंबर रोजी गणपती स्थापना शुभ मुहूर्त

देवांना अत्यंत प्रिय असणाऱ्या या फुलांच्या माळा अर्पण करा; मिळवा विशेष आशीर्वाद!

गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी ३ प्रकारच्या चॉकलेट मोदकांची रेसिपी

कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी रोजच्या आहारात हे पदार्थ खा; हाडे आणि दात राहतील मजबूत!

खाऊन योग करणे योग्य आहे की अयोग्य, जेवणानंतर योगा करण्याचे परिणाम जाणून घ्या

पुढील लेख
Show comments