Biodata Maker marathi
✕

Guru Purnima 2026: गुरु पौर्णिमेला गुरुंची पूजा कशी करावी? जाणून घ्या पूजेची योग्य पद्धत, शुभ मुहूर्त आणि महत्त्व

Updated: बुधवार, 29 जुलै 2026 (09:21 IST)
 
गुरु पूजेची योग्य पद्धत
जर तुमचे गुरु प्रत्यक्ष उपस्थित असतील, तर त्यांच्या चरणांचे पूजन करावे. जर ते दूर असतील किंवा या जगात नसतील, तर त्यांच्या प्रतिमेची (फोटोंची) किंवा आद्यगुरु व्यास ऋषींच्या प्रतिमेची पूजा पुढील पद्धतीने करावी:
 
स्नान आणि संकल्प:
गुरु पौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करावे. त्यानंतर देवघरात जाऊन स्वच्छ कपडे परिधान करून पूजेचा संकल्प करावा.
 
पूजेची जागा आणि मांडणी:
ईशान्य किंवा पूर्व दिशा.एक स्वच्छ पाट किंवा चौरंग मांडावा. त्यावर पांढरे किंवा पिवळे वस्त्र अंथरावे. त्यावर गुरु किंवा महर्षी व्यासांची प्रतिमा किंवा फोटो स्थापित करावा.
 
चरण वंदन आणि अभिषेक:
गुरु प्रत्यक्ष असल्यास त्यांच्या चरणांवर पाणी व दूध अर्पण करून चरण धुवावेत (चरणस्पर्श करावा) आणि कापडाने पुसावेत. प्रतिमेची पूजा करत असल्यास फुलाने पाणी आणि पंचामृताचे शिंतोडे उडवावेत.
 
गंध, अक्षता आणि वस्त्र अर्पण:
गुरूंना किंवा त्यांच्या प्रतिमेला चंदन, हळद-कुंकू आणि अक्षता लावाव्यात. पिवळ्या रंगाची फुले किंवा हार अर्पण करावा. तसेच नवीन वस्त्र किंवा उपरणे (शाल) अर्पण करावी.
 
भोग आणि आरती:
धूप-दीप ओवाळावा. गुरूंना आवडणारा गोड पदार्थ किंवा पेढे, फळे यांचा नैवेद्य (भोग) दाखवावा. त्यानंतर कापूर लावून गुरूंची आरती करावी.
 
गुरु मंत्र
पूजेदरम्यान किंवा पूजेनंतर शांत चित्ताने बसून खालील प्रसिद्ध गुरु मंत्राचा जप करावा:
 
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः।
गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः॥
 
पूजेच्या शेवटी गुरूंना दक्षिणा देऊन त्यांचे आशीर्वाद घ्यावेत आणि आपल्या हातून घडलेल्या चुकांची क्षमा मागावी.

सर्व पहा

श्री विष्णूची आरती; आवडी गंगाजळे देवा न्हाणीलें | भक्तीचे भूषण प्रेमासुगंध अर्पिले |

Ekadashi Stotram एकादशीला म्हणावीत ही स्तोत्रे! पठण करण्याचे नियम व फायदे

एकादशीला श्री विष्णु सहस्रनाम स्तोत्र वाचनाचे महत्व; सर्व संकटे व त्रास दूर होतील

आरती शनिवारची-पुजेच्या प्रांतीं अभ्यंग करी

मासिक पाळी सुरू असताना नवस किंवा व्रत मोडते का? जाणून घ्या धार्मिक समजुती

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

पुढील लेख
Show comments