शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. हनुमान जयंती
Written By
Last Modified: सोमवार, 26 एप्रिल 2021 (18:24 IST)

Hanuman Jayanti हे सोपे उपाय करा, निरोगी रहा, आर्थिक लाभ मिळवा

हिंदू पंचांगानुसार चैत्र महिन्याच्या पौर्णिमेला हनुमान जयंती साजरी केली जाते. हा दिवस खूप विशेष असल्याचं म्हणतात. या दिवशी हनुमानाची पूजा-आराधना केल्याने विशेष आशीर्वाद प्राप्ती होते आणि सर्व संकटापासून मुक्ती मिळते. 
 
1. हनुमान जयंतीला हनुमानाची पूजा करुन त्यांच्यासमोर तुपाचा ‍किंवा तेलाचा दिवा लावावा. 11 वेळा हनुमान चालीसा पाठ करावा. याने मारुती प्रसन्न होऊन जीवनातील प्रत्येक समस्येपासून मुक्ती मिळते.
 
2. हनुमान जयंतीला मारुतीला गुलाबाच्या फुलांची माळ अर्पित करावी. हनुमानाला प्रसन्न करुन त्यांची कृपा प्राप्तीसाठी हा उपाय सर्वात सोपा असल्याचं म्हटलं गेलं आहे.
 
3. धन प्राप्तीसाठी हनुमान जयंतीच्या दिवशी हनुमानाच्या मूर्तीसमोर चमेलीच्या तेलाचा दिवा लाववा. या व्यतिरिक्त शेंदूर लावून हनुमानाला चोला अर्पित करावा.
 
4. धन हानीपासून वाचण्यासाठी हनुमान जयंतीच्या दिवशी 11 पिंपळाचे पाने घेऊन त्यावर श्रीराम नाव लिहावे. हे पानं हनुमानाला अर्पित करावे. या उपायाने धन संबंधी समस्या सुटतात आणि मनोकामना पूर्ण होतात.
 
5. हनुमान जयंतीला विडा तयार करुन हनुमानाला अर्पित करावा. 
 
या व्यतिरिक्त या दिवशी हनुमान चालीसा, बजरंग बाण, मारुती स्त्रोत पाठ करावं.