सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Modified: सोमवार, 11 जानेवारी 2021 (08:41 IST)

बजरंग पाठ करण्यापूर्वी 10 खास गोष्टी जाणून घ्या

श्री रामचरित मानस लिहिणारे गोस्वामी तुलसीदास ह्यांनी रामचरित मानस लिहिण्यापूर्वी हनुमान चालीसा लिहिली होती आणि हनुमानाच्या कृपेनेच ते श्रीरामचरित मानस लिहू शकले. असं म्हणतात की बजरंगपाठ देखील तुलसीदास ह्यांनीच लिहिले होते. चला जाणून घेऊ या की हे पाठ का करावे आणि पाठ करताना काय सावधगिरी बाळगायला पाहिजे. 
 
असे म्हणतात की गोस्वामी तुलसीदास ह्यांच्यावर काशीमध्ये एका तांत्रिकाने मारण मंत्राचा वापर केला होता. त्यावेळी त्यांचे शरीर उकळले होते. नंतर त्यांनी बजरंग पाठ वाचून हनुमानाला मदतीसाठी आळवले होते. हे पाठ केल्याने त्यांचे फोड एका दिवसातच बरे झाले. तेव्हापासून असा विश्वास आहे की हा पाठ शत्रूंवर हल्ला करतो.
 
1 बजरंग पाठ का करतात ? 
बरेच लोक आपल्या कृतीमुळे लोकांना नाराज करतात, त्यामुळे त्यांचे शत्रू वाढतात. काही लोकांना स्पष्ट बोलण्याची सवय असते ज्यामुळे त्यांचे गुपित शत्रू असतात. असं देखील शक्य आहे की आपण चांगले आहात आणि आपल्या होणाऱ्या प्रगतीमुळे देखील लोक आपला हेवा करतात आपल्या विरोधात कट कारस्थान रचतात. अशा परिस्थितीत आपण खरे आहात तर बजरंग पाठ आपल्याला शत्रूंपासून वाचवून आपल्या शत्रूंना शिक्षा करतात.
2 खरे आणि पवित्र लोकांनी हे वाचावे -
बजरंग पाठ केल्याने शत्रूंना त्यांच्या केलेल्या कृत्याची शिक्षा मिळते, परंतु ह्याचा पाठ एका जागी बसूनच विधिविधानाने 21 दिवस करावा आणि नेहमी सत्याच्या मार्गावर चालण्याचा संकल्प घ्यावा, कारण हनुमान नेहमी खऱ्या आणि पवित्र लोकांचा साथ देतात. 21 दिवसात त्वरितच फळ मिळतो. कधी कोणाच्या वाईट हेतूने बजरंग पाठ करू नये. कोणत्याही अनैतिक कृत्यासाठी बजरंग पाठ करू नये. किंवा कोणत्याही विवादाच्या स्थितीत विजय मिळविण्यासाठी बजरंग पाठ करू नये. आयुष्यात काम करणे खूप आवश्यक आहे म्हणून कोणतेही काम न करता यशःप्राप्तीचा हेतूने बजरंग पाठाचे पठण करू नये.
 
3 खबरदारी -
बजरंग पाठ साठी म्हटले जाते की ह्याचा वापर कुठेही कोणीही करू नये. एखादी व्यक्ती गंभीर संकटात असेल तरच हे वापरावे. हे वापरण्यापूर्वी ह्याला सिद्ध करावे. ह्याचा वापर करताना सावधगिरी बाळगावी. ह्या मध्ये कोणतीही चूक होता कामा नये. जेवढ्या वेळा बजरंगापाठचा संकल्प घ्याल तेवढ्यावेळा रुद्राक्षाच्या माळी ने पाठ करावा. बजरंग पाठ करताना त्याच्या शब्दांचा उच्चार स्वच्छ आणि स्पष्ट असावा. आपण एखाद्या विशिष्ट उद्देशाच्या इच्छा पूर्तीच्या हेतूने बजरंग पाठ वाचत आहात तर किमान 41 दिवस पर्यंत हे पाठ नियमानं वाचावे. जेवढ्या दिवस हे पाठ करावयाचे आहे तेवढ्या दिवस ब्रह्मचर्य पाळणे आवश्यक आहे. ह्या पाठाचे वाचन करण्याच्या काळात कोणत्याही प्रकारचे मद्य किंवा तामसिक वस्तूंचा सेवन करू नये.
 
4 विधिवत वाचन करावं- 
हे पठण करताना हनुमानाच्या चित्रा समोर, मूर्ती समोर कुशासन वर बसून विधिविधानाने पूजा करून त्याचे पठण करावे.
 
5 बजरंग पाठ कधी करावे-
ह्या पाठाचे वाचन बऱ्याचवेळा शनिवारीच केले जाते, परंतु मंगळवारी देखील ह्याचे पठण करू शकता.
 
6 पठण पूर्वी काय करावं- 
हे पाठ करण्यापूर्वी संकल्प घ्यावे की आपले इच्छित कार्य पूर्ण झाल्यावर हनुमानांसाठी नियमानं काही न काही करू. या शिवाय रामाची स्तुती वाचावी आणि विधिविधानाने पूजा केल्यावर पठण करावं. पाठ पूर्ण झाल्यावर भगवान श्रीरामाचे नाम स्मरण करून कीर्तन करा.
 
7 तुपाचा दिवा लावा- 
पाठ करण्यापूर्वी 5 वातींचा तुपाचा दिवा लावा. अशा प्रकारे 7 गुग्गुळाची धुपकांडी लावून सुवास पसरवा.
 
8 हे अर्पण करा- 
हनुमानाला चमेलीचे तेल, गूळ, हरभरे, जानवं, विडा पान अर्पण करा. चुरमा लाडू आणि इतर हंगामी फळे देखील देऊ शकता.
 
9 शनी-राहू-केतू पासून मुक्ती मिळते -
कोणत्याही अपघाताला राहू-केतू-शनी हे घडवतात. जसे एकाएकी आग लागणे, गाडीचा अपघात होणं किंवा एखादे संकट येणं.हनुमानजी या सर्व संकटापासून वाचवतात. या साठी आपण नेहमी त्यांच्या शरणी जाऊन बजरंग पाठचे वाचन करू शकता.
 
10 मंगळदोषापासून मुक्ती मिळते- 
जर एखाद्याच्या कुंडलीत मांगलिक दोष आहे ज्यामुळे त्याचे लग्न होत नाही किंवा वैवाहिक जीवनात संकट येत आहेत तर नियमानं मंगळवारी बजरंगापाठचे वाचन करावं. नियमानं हे पाठ पठण केल्यानं मांगलिक दोष लवकरच दूर होतात.