सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Modified: मंगळवार, 19 मे 2020 (07:26 IST)

5 secrets of Shri Radha, आपल्याला माहीत नसलेले राधाचे आश्चर्यकारक गुपिते

भगवान श्रीकृष्णाची प्रेयसी राधा. महाभारतात 'राधा' च्या नावाचा उल्लेख कुठेच नाही. पद्म पुराण, विष्णू पुराण, ब्रह्मवैवर्त पुराणात राधाचा उल्लेख आहे. राधा आणि रुक्मिणी या दोघीही कृष्णांपेक्षा वयाने मोठ्या होत्या. आख्यायिका आणि दंतकथांवर असलेल्या राधाराणीच्या विषयी 5 गुपिते जाणून घेऊया. 
 
1 पहिलं गुपित :
पद्म पुराणानुसार राधा वृषभानू नावाच्या एका वैश्य गोप्याची कन्या होती. तिच्या आईचे नाव कीर्ती असे. तिचे नाव वृषभानू कुमारी पडले. राधाचे वडील वृषभानू बरसाना येथे वास्तव्यास होते. काही विद्वानांच्या मतानुसार राधाजीचा जन्म यमुनेच्या जवळ असलेल्या रावळ गावात झाला त्यानंतर तिचे वडील बरसाना येथे वास्तव्यास आले. बहुतेकांचा विश्वास असे की राधाजींचा जन्म बरसाना येथे झाला होता.
 
पुराणानुसार श्रीकृष्णाचा जन्म अष्टमी तिथीवर कृष्ण पक्षात झाला होता, आणि याच तिथीला शुक्लपक्षात राधाचा जन्म झाला होता. बरसाना येथे राधाष्टमीचा सण फार मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. राधाष्टमीचा सण जन्माष्टमीच्या 15 दिवसानंतर भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील अष्टमीला साजरा केला जातो. 
 
राधाराणीचे जगप्रसिद्ध देऊळ बरसाना गावाच्या टेकडीवर आहेत. या गावात राधाराणीला 'लाडली' म्हटले जाते. राधाचे प्राचीन देऊळ मध्ययुगातील असून लाल आणि पिवळ्या पाषाणाने बनविले आहेत. 1675 साली राजा वीरसिंह याने हे भव्य देऊळ बनविले होते.
 
2 दुसरं गुपित : 
ब्रह्मवैवर्त पुराणातील प्रकृती खंडाच्या अध्याय 49 श्लोक 35, 36, 37, 40, 47 च्या अनुसार एका वेगळ्या नात्याने राधा श्रीकृष्णाची मामी पण होती. कारण त्यांचे लग्न कृष्णाची आई यशोदाचा भाऊ रायाणशी झाला होता. रायाणला रापाण किंवा अयानघोष या नावाने देखील ओळखतात. पूर्व जन्मी राधाचा पती रायाण गोलोकात श्रीकृष्णाचा अंशभूत गोप होता. म्हणून गोलोकाच्या नात्याने राधा श्रीकृष्णाची सून असे. 
 
अशी आख्यायिका आहे की रायाण गोकुळात वास्तव्यास होते. त्याचा अर्थ असा की श्रीकृष्ण आणि राधाचं गत जन्मापासूनच नातं आहे. तसेच तिला लक्ष्मीचे रूप मानले गेले आहे. ब्रह्मवैवर्त पुराणाच्या ब्रह्माखंडातील 5 व्या अध्यायातील श्लोक 25 आणि 26 च्या अनुसार राधाला कृष्णाची मुलगी म्हणून सिद्ध केले आहे. 
 
3 तिसरं गुपित : 
ब्रह्मवैवर्त पुराण प्रकृती खंड अध्याय 48 च्या अनुसार आणि यदुवंशीय कुलगुरू गर्ग ऋषींनी लिहिलेल्या गर्ग संहिताच्या कथेनुसार नंदबाबा एकदा श्रीकृष्णाला घेऊन बाजारहाटात जातात. राधा आणि तिचे वडील देखील त्याच वेळी तेथे पोहोचतात. तिथे त्या दोघांची भेट होते. त्यावेळी दोघेही वयाने लहान असतात. ती जागा प्रतिकात्मक तीर्थ स्थळ म्हणवली जाते. हे स्थळ बहुदा नांदगांव ते बरसानेच्या मध्ये आहे. संकेत या शब्दाचा अर्थ आहे पूर्वनिर्धारित भेटण्याचे ठिकाण. या बाबत ब्रह्मवैवर्त पुराणात एक मोठी कथा आहे.
 
श्रीमद् भागवत आणि विष्णू पुराणानुसार कंसाच्या अत्याचारापासून वाचण्यासाठी नंद आपल्या कुटुंब आणि आप्तेष्टांसह नांदगाव येथून वृंदावनास स्थायिक झाले. येथे बरसाणेचे लोकंही होते. असे मानले जाते की इथेच वृंदावनात श्रीकृष्ण आणि राधा एकाच घाटावर जोड्याने स्नान करीत असे. त्या वेळी श्रीकृष्ण 7 वर्षांचे होते आणि राधा ही 12 वर्षांची होती. त्यांच्याच वयोगटाच्या मुलांचा मोठा गोतावळा असे. जो दिवसभर धुडगूस घालायचा. मुलांच्या या धुडगुसाला भक्तिकाळाच्या कवींनी प्रेमलीलेत रूपांतर केले आहे. वृंदावनातच श्रीकृष्ण आणि गोप्या लपंडाव खेळत होते. येथेच श्रीकृष्ण आणि त्यांचे सर्व बाळसखा मिळून होळी आणि सर्व सणांवर नृत्य करीत होते. 
 
4 चवथं गुपित : 
11 वर्षाच्या वयोगटात श्रीकृष्ण मथुरेला गेले होते आणि तेथेच त्यांनी कंसाचा वध केला होता. जेणे करून मगध आणि भारताचा सर्वात शक्तिशाली सम्राट त्यांचा जीवनाचा शत्रू बनला, कारण कंस त्यांचा जावई असे. त्यानंतर राधा आणि कृष्ण मिलनाचा उल्लेख कुठेच आढळत नाही. असे म्हणतात की राधा आणि श्रीकृष्णाची शेवटची भेट द्वारकेत झाली होती. सर्व कर्तव्यापासून मुक्त झाल्यावर, राधा शेतीच्या वेळी आपल्या प्रियकर कृष्णाला भेटावयास गेली. ज्यावेळी ती द्वारकेला पोहोचली तेव्हा तिने कृष्णाचा राजवाडा आणि कृष्णाच्या 8 बायकांना बघितले. कृष्ण राधेला बघून फार आनंदित झाले. राधाच्या विनवणीला मान देऊन त्यांनी राधाला आपल्या राजवाड्यात एक देविका म्हणून नियुक्त केले. 
 
5 पाचवं गुपित : 
असे म्हटले जाते की तिथेच राधा राजवाड्याशी निगडित काम बघत असायची आणि संधी मिळाली की श्रीकृष्णाला बघायची. एके दिवशी राधाने त्या राजवाड्यापासून लांब जाण्याचे ठरविले. असे म्हणतात की राधा एका अरण्य गावात राहू लागली. वेळ सरता सरता राधा एकटी आणि दुर्बळ होऊ लागली. त्यावेळी त्यांना श्रीकृष्णाची आठवण येऊ लागली. शेवटच्या क्षणी श्रीकृष्ण तिच्या समोर आले. त्यांनी राधाला काहीही मागण्याचे सांगितले. पण राधाने नकार दिला. कृष्णाने तिला परत आग्रह केल्यावर तिने कृष्णाला बासरी वाजवायला सांगितले. श्रीकृष्ण मधुर सुरात बासरी वाजवू लागले. श्रीकृष्ण राधेसाठी दिवसरात्र बासरी वाजवीत असे. बासरीचे मधुर सूर ऐकतच राधाने आपल्या देहाचा त्याग केला.