शनिवार, 1 नोव्हेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: मुंबई , शुक्रवार, 8 मे 2020 (09:19 IST)

संपत्ती 13.2 अब्ज डॉलरने घटली तरी अंबानी अव्वल!

forbes india
प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय 'फोर्ब्स'ने देशातील श्रीमंत व्यक्तींची यादी जाहीर केली आहे. कोरोना व्हायरसुळे जगभरातील श्रीमंत व्यक्तींच्या संपत्तीत मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. अशीच घट भारतातील अब्जोपतींच्या संपत्तीत झाली आहे. आधीच देशात आर्थिक मंदीचे वातावरण होते. त्यात कोरोनामुळे जाहीर झालेल्या लॉकडाउन यामुळे मागणीत प्रचंड घट झाली आहे.
 
या सर्व पडझडीनंतर रिलायन्स उद्योग समूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या यादीत अव्वल स्थानी आहेत. अंबानी फक्त भारतातील नाही तर आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती  आहेत.
 
देशातील अब्जोपतींची संख्या गेल्या वर्षाच्या तुलनेत 106 वरून घटून 102 इतकी झाली आहे. तर या सर्वांच्या संपत्तीत 23 टक्क्यांनी घट होत ती 313 अब्ज इतकी झाली. संपत्तीमधील या घसरणीला सर्वात मोठे कारण ठरले ते अझीम प्रेमजी. त्यांनी आपल्या संपत्तीमधील मोठी रक्कम विप्रोमध्ये दान केली. यात अपवाद ठरले आहेत ते डी-मार्ट सुपर मर्केटचे राधाकिशन दानी. त्यांच्या संपत्तीत 13.8 बिलियन इतकी वाढ झाली आहे. या वाढीमुळे ते भारतातील दुसर्या् क्रमांकाचे सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत.