शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: शुक्रवार, 8 मे 2020 (08:52 IST)

आता झोमॅटो सुरू करणार दारूची डिलिव्हरी !

फूड डिलिव्हरी कंपनी झोमॅटो आता भारतात दारूची डिलिव्हरी करण्याच्या तयारीत आहे. या संदर्भात रॉयटर्सने आपल्या रिपोर्टमध्ये याबाबत माहिती दिली आहे. लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात सध्या दारूची मागणी वाढली आहे. झोमॅटोने या आधीच किराणा सामानाची डिलिव्हरी सुरू केली आहे.
 
सध्या भारतात घरपोच दारूचे वितरण करण्यासाठी कोणतीही कायदेशीर तरतूद नाही. मात्र इंटरनॅशनल स्पिरिट्स आणि वाईन्स असोसिएशन ऑफ इंडिया (आयएसडब्ल्यूएआय) याची सुरूवात करण्यासाठी लॉबिंग करत आहे. झोमॅटोचे फूड डिलिव्हरीचे सीईओ मोहित गुप्ता यांनी आयएसडब्ल्यूएआय लिहिले की, आम्हाला विश्वास आहे की टेक्नोलॉजीच्या मदतीने वितरण केल्याने दारूच्या विक्रीत वाढ होईल.
 
सध्या भारतात वेगवेगळ्या राज्यात दारू पिण्यासाठी कायदेशीर वय 18 ते 25 वर्ष असणे आवश्यक आहे. आयएसडब्ल्यूएआयचे एक्झिक्यूटिव्ह चेअरमन अम्रित किरण सिंह म्हणाले की, राज्यांनी दारूच्या वितरणाची परवानगी द्यावी. जेणेकरून लॉकडाऊनमुळे राज्याला झालेले नुकसान भरून निघेल.