1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : बुधवार, 6 मे 2020 (12:56 IST)

दारूसाठी रांगा लावणाऱ्यांचे रेशन कार्ड रद्द करा, ते धान्य खरेदी करु शकतात

Rimtiaz jaleel
औरंगाबाद- दारू खरेदी करण्यासाठी रांगते लागणार्‍यांचे रेशन कार्ड रद्द करावे अशी मागणी एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी राज्य सरकारकडं केली आहे. त्याच्याप्रमाणे दारुसाठी पैसा खर्च करणारे अन्नधान्यही नक्कीच खरेदी करू शकतात. 
 
लॉकडाऊनच्या तिसर्‍या टप्प्यात वाईन शॉप्स उघडण्याचा निर्णय चुकीचा असून या दरम्यान आरोग्याच्या दृष्टीनं किती नुकसान होतंय यावर जलील यांनी काळजी व्यक्त केली आहे. 
 
उल्लेखनीय आहे की वाइन शॉप सुरू होताच दारूच्या दुकानांसमोर रांगा लागल्या आणि सोशल डिस्टन्सिंगची एैशीतैशी झाली. परिणामस्वरुप मुंबईमध्ये दोन दिवसांनंतर पुन्हा एकदा वाइन शॉप बंद ठेवण्याचा निर्णय झाला आहे.